नागपूर : महाराष्ट्रातील आमदार अधिक जबाबदार आहेत. सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे असंसदीय वर्तन खपवून घेतले जाणार आहे. यामुळे सभागृहाचा वेळ जातो आणि लोकांचे नुकसान होते. करोनामुळे दोन-अडीच वर्षे अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस कमी होते, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदा नागपुरात आले. १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे त्यांनी विधानभवन, आमदार निवासची पाहणी केली आणि आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागपूर विधान भवनात मंत्र्यांची दालने, मध्यवर्ती सभागृह आणि इतर बाबींसाठी जागा अपुरी पडत असून विधान भवनच्या अतिरिक्त जागेसाठी आसपासची जमीन अधिग्रहित करण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आली आहे.

विधान भवन परिसरात जागेची कमतरता भासत आहे. मंत्र्यांची दालने देखील अपुरे आहेत. अधिवेशनापर्यंत ती उपलब्ध करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. विधान भवनाच्या आवारात काही पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. विधानसभा आणि विधानसभेतील ध्वनीप्रणाली अद्यावत करण्याची आवश्यकता आहे. थेट भाषांतर (डायरेक्ट ट्रान्सक्रीप्ट) होईल, अशी प्रणाली बसवण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. आमदार निवास पुनर्विकसित करण्याबाबत चर्चा झाली. विधान भवनात मध्यवर्ती सभागृह नाही. तो लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागपूर विधानच्या आवारात देखील आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असेही नार्वेकर म्हणाले.

sharad pawar wardha lok sabha election 2024
शरद पवार वर्धेच्या लोकसभा लढतीत एवढे स्वारस्य का दाखवताहेत? जाणून घ्या यामागील कारण…
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
, Buldhana, case registered, congress party, rahul bondre, violation of code of conduct
बुलढाणा: ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल

हेही वाचा : ज्याच्या अपहरणाचा कट रचला त्यानेच दातृत्व दाखवत आरोपींना दिली नोकरीची ऑफर, वाचा कधी आणि कुठे ते…

विदर्भात होणारे विधिमंडळाचे अधिवेशन एक किंवा दोन आठवड्याचे असते. विदर्भात सरकार फार काळ थांबत नाही. यावेळी अधिवेशन किती दिवसांचे असेल यावर नार्वेकर म्हणाले, सरकारच्या कामकाज समितीने ठरवलेल्या कामकाजावर अवलंबून आहे. अधिवेशन किती दिवस चालले यापैकी त्यात कामकाज काय झाले. हे महत्त्वाचे आहे. मुंबईत झालेल्या मागील अधिवेशनात नऊ तास पंचवीस मिनिटे काम दररोज चालेल. वेळ वाया गेला नाही.