नागपूर : विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. राज्य सरकारला विरोधी पक्षनेता हवा असल्यास त्या पदासाठी नाव सुचवण्यात येईल अन्यथा नाही, असे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे स्पष्ट केले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात चर्चेअंती विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव निश्चित केले जाईल. पण, भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात खरच विरोधी पक्षनेता हवा आहे का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे नाव सुचवण्यापूर्वी आधी मुख्यमंत्र्यांना विचारले जाईल आणि त्यानंतर नाव सुचवले जाईल. आधीच नाव देऊन उपयोग नाही. आम्ही नाव सुचवायचे आणि तोंडघशी पडायचे, याला काही अर्थ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतरच नाव दिले जाईल आणि अन्यथा नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस

हेही वाचा >>>यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

गटनेता ठरलेला नाही

काँग्रेसचा नेटनेता अद्याप ठरलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. पक्षश्रेष्ठींशी बोलणेही झाले असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

खातेवाटप सत्ताधाऱ्यांचा प्रश्न

सरकारमध्ये खातेवाटपावरून सुरू असलेल्या गोंधळाविषयी ते म्हणाले, कोणते खाते कोणाला द्यावे हा सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठी जे खाते देतील ते घ्यावे लागेल हे मात्र निश्चित. शिंदे, पवार यांच्या रुसण्या-फुगण्याला काही अर्थ नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

पुष्पा-२ कोण?

विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर संशय आहे. पुष्पा-२ चित्रपट आला आहे. त्यातील नायकाप्रमाणे काम करून येथील सरकार आल्याची लोकांची भावना आहे. आता हे महाराष्ट्रातील पुष्पा-२ कोण मला सांगायची गरज नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….

केंद्र सरकार कर्नाटक सीमावादावर अंतिम निर्णय घेऊ शकतो. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घातले तर कायम स्वरुपी प्रश्न मिटेल. केंद्रात आणि कर्नाटकात एकाच पक्षाची सरकार असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यात लक्ष घातल्यास चुटकी सरशी मार्ग निघेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

जनता ईव्हीएमवर मतदान प्रक्रियेबाबत साशंक आहे. जगभरातील प्रगत देश मतपत्रिकेवर निवडणुका घेतात आणि आपण लोकांना ईव्हीएमवर विश्वास नसतानाही त्याचा आग्रह धरतो. याबाबत निर्णय झाला पाहिजे आणि पुढच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या गेल्या पाहिजे. ईव्हीएम आणि मतांची टक्केवारीवरून सर्वोच्च न्यायलायात दाद मागणार आहोत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader