scorecardresearch

नागपूर: पटोलेंच्या विरोधात वडेट्टीवार समर्थक दिल्लीत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाल्याचे समजते.

nana patole and viajay vaddetiwar
पटोलेंच्या विरोधात वडेट्टीवार समर्थक दिल्लीत( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाल्याचे समजते.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून वडेट्टीवार आणि केदार यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत. चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत वडेट्टीवार यांच्या समर्थकांची नाराजी पटोले यांच्याविरोधात दिसून आली होती. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पदमुक्त केले आहे. दुसरीकडे, केदार यांच्याशीही पटोले यांचे मतभेद आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या