scorecardresearch

Premium

कंत्राटी भरती विरोधात आंदोलन आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका

स्पर्धा परीक्षा संघर्ष कृती समिती द्वारा वर्धा येथे आयोजित लाक्षणिक उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा दिला.

Vijay Wadettiwar's appeal against contract recruitment government
कंत्राटी भरती विरोधात आंदोलन आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: शासनाने काढलेल्या कंत्राटी भरती विरोधात राज्यातील युवा वर्गात प्रचंड आक्रोश आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाला राज्यात ठिकठिकाणी विरोध केला जात आहे. राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर काढला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारामध्ये संताप निर्माण झाला आहे. राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या लाखो बेरोजगार तरुणांची गळचेपी केली आहे.

वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय फाडून महायुती सरकारचा निषेध राज्यातील अनेक भागात होत आहे. पुढे सुद्धा जोपर्यंत सरकार निर्णय रद्द करणार नाही तोपर्यंत या निर्णयाचा विरोध महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मोर्चा आणि आंदोलन करून करावे, असे आवाहन यावेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

india alliance future in danger, congress mla sukhpal singh khaira arrested, punjab congress mla arrested by aap
‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली
rahul gandhi
सत्तेवर आल्यास जातीनिहाय जनगणना -राहुल गांधी 
Pratibha Shinde Lok Sangharsha Morcha 2
“२०२४ निवडणुकीत महिला आरक्षण लागू करायला अडचण नाही, मग…”, लोक संघर्ष मोर्चाचा सवाल
kalavati bandurkar participate in congress jan samswad yatra
शान की सवारी: कलावती बांदूरकर काँग्रेसच्‍या जनसंवाद यात्रेत; आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या स्‍कूटरवर बसून प्रवास

हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात

स्पर्धा परीक्षा संघर्ष कृती समिती द्वारा वर्धा येथे आयोजित लाक्षणिक उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा दिला. त्यानंतर एक्स (ट्विट) वडेट्टीवार त्यांनी भूमिका मांडली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwars appeal against the contract recruitment by the government rbt 74 dvr

First published on: 02-10-2023 at 12:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×