scorecardresearch

Premium

“नागपुरात आलेला पूर मानवनिर्मित! नागनदीचा नाला कोणी केला,” विकास ठाकरे यांचा सवाल

शुक्रवारी आलेला पूर हा मानवनिर्मित आहे. याला प्रशासन जबबादार आहे, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.

Vikas Thackeray criticizes the administration
आमदार विकास ठाकरे यांची प्रशासनावर टीका (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावाच्या विसर्ग पॉईंट म्हणजेच ‘ओव्हर फ्लो’ पॉईंटसमोर स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी बांधण्यात आलेल्या चबुतऱ्यामुळे पाणी अडते. त्यामुळे अंबाझरी तलावाची भिंत कमकुवत होत आहे. शुक्रवारी आलेला पूर हा मानवनिर्मित आहे. याला प्रशासन जबबादार आहे, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.

mhada houses thane
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ
Bharatmala Project
गडचिरोली : भारतमाला परियोजना, समृद्धी महामार्गाला रानटी हत्तींचा धोका
700 MW solar power plant Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात लवकरच ७०० मेगॉवट वीज निर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्प
National Clean Air Programme, Sharing Cycle initiative Chandrapur
चंद्रपुरात १०० रुपयात मिळणार ‘शेअरिंग सायकल’; नेमका काय आहे उपक्रम, जाणून घ्या…

आणखी वाचा-चंद्रपूर : २५ उपकेंद्रासाठी २६९ एकर जमीन महावितरणला भाडेपट्ट्यावर उपलब्ध

अंबाझरी लेआऊट, वर्मा लेआऊट, डागा लेआऊट हे नासुप्रने मंजूर केलेले लेआऊट आहेत. येथील बांधकामाचा नकाशा नासुप्रने मंजूर केला आहे. या अधिकृत वसाहती आहेत. पण, नासुप्रने ‘क्रेझी कॅसल’च्या वॉटर पार्कला परवानगी दिली. त्यानंतर नाग नदीचे ६० फूट रुंद पात्र २० फूट करण्यात आले. त्यामुळे ‘ओव्हरफ्लो’च्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आणि पाणी वसाहतीमध्ये शिरले. पाण्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यात यावा, अरुंद केलेली नदी पूर्ववत करण्यात यावी तसेच गोरेवाडा तलावाचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे तेथे तातडीने भिंती बांधावी, असे आमदार विकास ठाकरे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vikas thackeray criticizes the administration says flood in nagpur is man made rbt 74 mrj

First published on: 26-09-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×