scorecardresearch

Premium

वर्धा : शिक्षकच नाही तर शाळा उघडता कशाला? गावकऱ्यांचा सवाल अन ठोकले कुलूप

गत तीन महिन्यांपासून गावकरी शिक्षक नेमण्याची मागणी करीत आहे. शेतमजुरांच्या मुलांनी शिकू नये का, असा सवाल करीत शेवटी शाळेस टाळे ठोकण्यात आले.

Villagers locked school Dhochi
वर्धा : शिक्षकच नाही तर शाळा उघडता कशाला? गावकऱ्यांचा सवाल अन ठोकले कुलूप (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वर्धा : शाळेत मुलांना शिकविण्यास शिक्षक नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात आंदोलन उभारले. प्रतिसाद न मिळाल्याने हिंगणघाट तालुक्यातील धोची येथील शाळेस कुलूप ठोकले.

ही पोहणा केंद्रातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत पाच वर्ग असून एकच शिक्षक मुख्याध्यापक पद तसेच सर्वेक्षण, माहिती संकलन, विविध प्रकल्प, पोषण आहार व अन्य जबाबदाऱ्या सांभाळतो. त्यामुळे शिकविण्याचे कार्य ठप्प पडले आहे. गत तीन महिन्यांपासून गावकरी शिक्षक नेमण्याची मागणी करीत आहे. शेतमजुरांच्या मुलांनी शिकू नये का, असा सवाल करीत शेवटी शाळेस टाळे ठोकण्यात आले.

Eyes injured pune laser beam
धक्कादायक! ‘लेझर बीम’मुळे पुण्यात १५ जणांच्या डोळ्यांना इजा, पुण्यातील विविध रुग्णालयांत नोंद; कायमस्वरुपी दृष्टी जाण्याचा धोका
Soham Suresh Uik
थेट सीईओंच्या खुर्चीत बसला, पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलवून स्वागत केले; असं काय केलं सोहमने, वाचा…
maharashtra health department farmer suicide
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी!, आठ महिन्यांमध्ये विदर्भ अन् मराठवाड्यात…
pune mohol gang, mohol gang kidnapped 2 womans in pune
पुण्यात दोन महिलांचे खंडणीसाठी अपहरण, मोहोळ टोळीतील चार जणांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा – चंद्रपूर : शास्त्रज्ञांचे पथक पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर, सोयाबीन पिकाची पाहणी

हेही वाचा – कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला

येत्या तीन दिवसांत नेमणूक न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वांदिले यांनी दिला. दशरथ ठाकरे, ओंकार मानकर, माजी सरपंच प्रकाश बावणे, सरपंच नीतू डंभारे, उपसरपंच मोतीराम देवडे, शाळा समितीच्या रुपाली नरुले, गजानन कौसर, वंदना नैताम, माधुरी नेवाडे, दिपाली डंभारे, निलेश इंगळे, प्रशांत दाते, मनोहर बावणे, सुनील साठे, अतुल कोल्हे आदींनी नेतृत्व केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Villagers locked the school at dhochi in hinganghat taluka pmd 64 ssb

First published on: 27-09-2023 at 10:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×