scorecardresearch

नागपूर: समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन; म्हणतात रस्त्यावर मृत मिळाल्यास तात्काळ विल्हेवाट लावा

समृद्धी महामार्ग म्हणजे वन्यजीवांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार ठरले असताना व्यवस्थापनाकडून आता वन्यजीव संरक्षण कायद्याची देखील पायमल्ली केली जात आहे.

नागपूर: समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन; म्हणतात रस्त्यावर मृत मिळाल्यास तात्काळ विल्हेवाट लावा
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

समृद्धी महामार्ग म्हणजे वन्यजीवांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार ठरले असताना व्यवस्थापनाकडून आता वन्यजीव संरक्षण कायद्याची देखील पायमल्ली केली जात आहे. या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यास तात्काळ त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश महामार्ग व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>>भंडाऱ्यात पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध; सिनेमागृहाबाहेर घोषणाबाजी करत पोस्टर जाळले

या महामार्गावर दररोज सरासरी तीन वन्यजीवांचा अपघाती मृत्यू होतो. हिंगणा परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातात एकाच दिवशी १४ रानडुकरे मृत्युमुखी पडण्याचा रेकॉर्ड देखील झाला आहे. माकड, रानडुक्कर, निलगाय, साप असे असंख्य प्राणी महामार्गावरील उपशमन उपायांऐवजी महामार्गावर येत आहेत आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडत आहेत. अनेकदा रस्त्यावरच त्यांचा जीव जातो, तर बरेचदा ते कसेबसे रस्त्यावरुन बाजूला जातात आणि मृत्युमुखी पडतात. या महामार्गावर मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांच्या विल्हेवाटीचा प्रश्न नुकताच समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यवर वन्यप्राणी मृत्युमुखी पडला असल्यास तात्काळ त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश महामार्ग व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे कळते.

हेही वाचा >>>भंडाऱ्यात पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध; सिनेमागृहाबाहेर घोषणाबाजी करत पोस्टर जाळले

शक्यतोवर कुणाला तो मृत वन्यजीव दिसण्याआधीच त्याची विल्हेवाट लावावी, असेही सांगितले गेले आहे. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कोणताही वन्यजीव मृत्युमुखी पडल्यास त्याला जाळण्या अथवा जमिनीत पुरण्याआधी त्याचे शवविच्छेदन होणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत समृद्धी महामार्गावर मृत पावलेल्या एकाही वन्यजीवांचे शवविच्छेदन झालेले नाही. विशेष म्हणजे वनखात्याने देखील हे जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत असताना वनखात्यानेही मूक भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त् करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या