भंडारा: झाडीपट्टीत दिवाळीनंतर गावागावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. लोककलेचा वारसा असलेल्या या उत्सवात आता काही गावांमध्ये डान्स हंगामाचा धुमाकूळ सुरू झाला असून बाहेर राज्याहून आणलेल्या नृत्यांगनासोबत अश्लील नृत्य केले जात आहे. असाच एक लज्जास्पद आणि किळसवाणा प्रकार तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावच्या डान्स हंगामात झाला असून डान्स करताना तरुणीने चक्क विवस्त्र होत अश्लीलतेचा कळस गाठला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात झाला.

तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथे १८ नोव्हेंबर रोजी डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर हून डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना पाचारण करण्यात आले होते. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरवातीला लावण्या आणि डान्स सुरू होते. हळूहळू कार्यक्रम रंगत गेला आणि रात्री २ वाजतानंतर कार्यक्रमाला अश्लीलतेचा रंग चढला. या हंगामात नृत्य करणाऱ्या एका तरुणीने एक एक करीत अंगावरील वस्त्र काढण्यास सुरूवात केली आणि क्षणातच ती विवस्त्र झाली. त्याच वेळी सोबतच्या तरुणाने सुध्दा तिच्या सोबत अश्लील नृत्य करण्यास सुरवात केली. त्यामुळे तरुण मंडळी शिट्टया वाजवून रंगात आली.

हेही वाचा… राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम; विदर्भातही पावसाची शक्यता

काही टवाळखोर तरुणांनी पैशांची उधळपट्टी करीत मंचाकडे येत या तरुणीची छेड काढण्यास सुरवात केली. काहींनी विवस्त्र तरुणीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अश्लीलतेचा कळस गाठत डान्स करणारे तरुण तरुणी अचानक तोल जाऊन स्टेज खाली पडले. हा सर्व प्रकार शरमेने मान खाली घालावी लागणारा होता. या सर्व प्रकारचा कुणीतरी व्हिडीओ काढला. मात्र, दोन दिवस हा व्हिडिओ कुणाच्या हाती लागू नये याची काळजी घेण्यात आली. अखेर आज हा व्हिडीओ एका गृपवर व्हायरल झाला. या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक आणि आर. के. डान्स हांगामा ग्रुपच्या संचालक व सदस्यांवर गोबरवाही पोलीस ठाण्यात विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अनभिज्ञ

डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लील नृत्य होण्याचा प्रकार आता नवीन नाही. मात्र, या सर्व प्रकारापासून पोलीस अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. आताही काही गावांमध्ये असे डान्स हंगामाचे कार्यक्रम सुरू असल्याची माहिती आहे. डान्स हंगामात मारहाण आणि तरुणीची छेड काढण्याचे प्रमाण वाढलेले असताना पोलिसांची भूमिका मात्र बघ्याची असते.

Story img Loader