नागपूर: एक मतदान केंद्र, सातशे मतदार, नंदनवनमध्ये मतदानासाठी गर्दी | Voting begins in Nagpur Division Teachers Constituency Crowd to vote in Nandanvan cwb76 amy 95 | Loksatta

नागपूर: एक मतदान केंद्र, सातशे मतदार, नंदनवनमध्ये मतदानासाठी गर्दी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त पतिसाद मिळताना दिसून येत आहे.

election
नंदनवनमधील केंद्र

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त पतिसाद मिळताना दिसून येत आहे. सावरकर नगर चौकातीलजुपिटर हायस्कूल मतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. नंदनवन महापालिका शाळा केंद्रामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. एकच मतदान केंद्र आणि ७०० मतदार अशी तेथे स्थिती होती. मतदानासाठी लागलेल्या रांगांवरून मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>नागपूर शिक्षक मतदार संघात दोन तासात १३.५७ टक्के मतदान

या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर मतदान सुरु असून सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १२.८६ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्हयात सकाळी १०.०० वाजेपर्यंत ११.९४ टक्के मतदान झाले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:14 IST
Next Story
नागपूर शिक्षक मतदार संघात दोन तासात १३.५७ टक्के मतदान