scorecardresearch

नागपूर: अल्पवयीन मुलीची पोटदुखीची तक्रार अन् गर्भवती असल्याचे झाले निदान; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

अल्पवयीन मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने काळजीपोटी मुलीला डॉक्टरकडे नेले.

crime news
(प्रातनिधिक छायाचित्र)

अल्पवयीन मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने काळजीपोटी मुलीला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने दवाखान्यातच मुलीच्या कानशिलात लगावताच तिने प्रियकराचे नाव सांगितले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) दहावीची विद्यार्थिनी आहे. तिची अमन विजय ठाकरे (२१, रा. वाडी) याच्याशी मैत्री होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. रिया शाळेत न जात थेट प्रियकरासोबत फिरयला निघून जात होती. शाळा सुटण्याच्या वेळी ती घरी पोहचत होती. नोव्हेंबर महिन्यात अमनने तिला शाळेतून सुटी घेऊन घरी बोलावले.

हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”

तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने लवकरच लग्न करण्याचे आमिष दिले. लग्न करणार असल्यामुळे रियानेही त्याला होकार दिला. त्यानंतर अमन तिला वारंवार शाळेतून घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. त्यातून ती गर्भवती झाली. तीन महिन्यापर्यंत गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले नाही. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. यामुळे गर्भवती असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. मात्र, पुढे काय करावे, याबाबत दोघांनी माहिती नव्हते. त्यामुळे अमनने हात झटकले आणि ‘तू तुझे बघून घे, माझे प्रेम तुझ्यावर प्रेम नाही तसेच लग्नही करणार नाही.’ अशी धमकी दिली. त्यामुळे रिया काळजीत पडली. दुसरीकडे पोटदुखीचा त्रास वाढला. तिने आईला पोट दुखत असल्याचे सांगितले.आईने २५ फेब्रुवारीला तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि रिया चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईने डोक्यावर हात मारून घेतला. तिने प्रियकर अमनचे नाव सांगितले. मायलेकींनी वाडी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकर अमन ठाकरेला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 16:14 IST
ताज्या बातम्या