scorecardresearch

नागपूर: विकृतीग्रस्त गर्भ असल्यामुळे शेतकरी मातेने उचलले ‘हे’ पाऊल…

बाळ शारीरिक व मानसिक विकृतीग्रस्त असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील एका शेतकरी मातेने गर्भपाताकरिता मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

nagpur

बाळ शारीरिक व मानसिक विकृतीग्रस्त असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील एका शेतकरी मातेने गर्भपाताकरिता मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी राज्य सरकारला येत्या २० फेब्रुवारीपर्यंत वैद्यकीय मंडळाचा अहवाल मागितला आहे. न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व वृपाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

हेही वाचा >>>नागपूर: क्रिकेट सट्टेबाजीने घेतला व्यापाऱ्याचा बळी, आत्महत्येपूर्वी…

पीडित माता २७ वर्षांची असून तिला पहिल्यांदा २३ जानेवारी २०२३ रोजी गर्भातील बाळ विकृतीग्रस्त असल्याचे समजले. त्यामुळे तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, वर्धा जिल्हा रुग्णालयाने बाळ २० आठवड्यापेक्षा जास्त असल्याने गर्भपात करण्यास नकार दिला.परिणामी, मातेने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता २८ आठवड्याचा गर्भ झाला आहे. मातेतर्फे ऍड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 11:43 IST