scorecardresearch

अस्थिरोग विभागात शस्त्रक्रियेसाठीही प्रतीक्षा !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अस्थिरोग विभागात रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बरेच दिवस ताटकळत रहावे लागते.

nagar1 pateint
संग्रहित छायाचित्र

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अस्थिरोग विभागात रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बरेच दिवस ताटकळत रहावे लागते. त्यामुळे येथील रुग्णांसह नातेवाईकांनाही मोठा मनस्ताप होत आहे.

मेडिकलमध्ये राज्यातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातून अस्थिरोगाचे रुग्ण उपचाराला येतात. मात्र, येथे रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी असल्यामुळे रुग्ण अनेक दिवस वॉर्डात दाखल असतो. रुग्णासोबत थांबणाऱ्या व्यक्तीचा एकीकडे रोजगार बुडतो, तर दुसरीकडे शस्त्रक्रिया लांबल्याने इतर खर्चही वाढतो.

येथे कमरे खालील हाडांमध्ये असलेल्या ‘बॉल’ बदलण्याचीही शस्त्रक्रिया होते. परंतु रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी असल्यामुळे दोन महिने वाट पहावी लागणार, असे खुद्द येथील डॉक्टरांनी मान्य केले. परंतु मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने एकही लेखी तक्रार मिळालेली नाही,असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Waiting surgery orthopedic department medical college hospital medical ysh