नागपूर – आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानिमित्ताने शहरात उत्सवाचे वातावरण आहे. रविनगर-रामनगर किंवा मेयो रुग्णालयासमोरील पोद्दारेश्वर मंदिराकडे जायचे असेल तर नक्कीच काही रस्ते टाळा.

धरमपेठकडून मेयोकडे जाताना गोरेपेठ, चिटणवीस सेंटर आणि आरबीआय चौकातून जाऊ शकता. मात्र, सीताबर्डी-कॉटन मार्केट चौकातून गेल्यास वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे. काही रस्त्यावर रॅली-मिरवणुका असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गर्दी आहे. तुकडोजी चौकाकडून मेयो चौकाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर रेशिमबागमार्गे महालकडून जाऊ नका. कारण त्या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी आहे. सक्करदरा किंवा उमेरड रोडकडून मेयो रुग्णालय चौकाकडे जायचे असेल महालकडून जाणारा रस्ता टाळा. महालकडील रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. सध्या महालमध्ये सर्वाधिक गर्दी असून वाहतूक कोंडीसुद्धा निर्माण झाली.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

हेही वाचा – नागपूर : फोन करण्यास परवानगी न मिळाल्याने कैदी थेट न्यायालयात…

हेही वाचा – फेसबुक ओळखीतून बलात्कार, न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

अंबाझरीतून पोद्दारेश्वर मंदिराकडे जायचे असेल तर सीताबर्डी- तेलीपुरा मार्गाची निवड करू नका. या रस्त्यावर वाहनांची गर्दी असून रामभक्तांचा जल्लोष सुरु असल्यामुळे रस्त्यावर कोंडी निर्माण झाली आहे. शताब्दी चौक-बेसाकडून रामनगरातील राममंदिराकडे जायचे असेल तर वंजारीनगरातून नवीन पुलावरून जाऊ शकता. परंतु, अजनी रेल्वेपुलावरून जाऊ नका. त्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पुलावरून एकेरी वाहतूक असल्यामुळे अनेक वाहने सध्या अडकलेली आहेत. मनिषनगरातून रामनगरातील राम मंदिराकडे जायचे असेल तर वर्धा रोड-कृपलानी चौक-पंचशिल चौक या रस्त्याचा वापर करू नका. या रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने कोंडी निर्माण झाली आहे. मानकापूर-पागलखाना चौकाकडून रामनगर चौकाकडे येत असाल तर संविधान चौकाऐवजी जीपीओ चौकाकडून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा. अन्यथा वाहतूक कोंडीत तासभरापेक्षा जास्त वेळ जाऊ शकतो.