scorecardresearch

वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धावत्या गाडीत बलात्कार

मुलगी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचली असतानाच तिला आरोपी सुमेध याने चाकूच्या धाकावर रोखले.

वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धावत्या गाडीत बलात्कार
( संग्रहित छायचित्र )

शाळेसमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या गाडीतच बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुलगावसारख्या लहान गावात अशी घटना घडल्याने जनमानस स्तब्ध झाले आहे.

हेही वाचा – जीवे मारण्याची धमकी, मुलीवर गुंडाचा बलात्कार

सुमेध व त्याचा साथीदार ऑटोचालक अद्याप पोलिसांना गवसले नाही. अल्पवयीन पीडिता घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मुलगी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचली असतानाच तिला आरोपी सुमेध याने चाकूच्या धाकावर रोखले. बळजबरीने खेचून तिला चारचाकी वाहनात डांबले. त्याच्या साथीदाराने लगेच गाडी हाकली. मुलीने आरडाओरड केली, मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने तिची आर्त हाक कोणालाही ऐकू आली नाही. नराधम सुमेधने धावत्या गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली. कशीबशी सुटका झाल्यावर पीडितेने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने पुलगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावर पोस्को व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wardha a minor girl was kidnapped and raped in a moving car amy

ताज्या बातम्या