स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी बावीस लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. वर्धा ते हिंगणघाट मार्गावरील बोरगावमधील एटीएम फोडण्यात अपयशी ठरलेल्या चोरट्यांनी वायगावमध्ये एटीएम फोडून बावीस लाख लंपास केले. हेही वाचा >>> उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केली नागपूर विद्यापीठातून ‘एमकेसीएल’ची हकालपट्टी; कुलगुरुंसह अधिकाऱ्यांची होणार चौकाशी चोरट्यांनी सावधगिरी म्हणून मशीनजवळील ‘सीसीटीव्ही’वर काळा रंग फासला. बोरगाव येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रथम प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुढे याच मार्गावरील वायगावला वळविला. येथील बँकेचे एटीएम कटरने फोडण्यात ते यशस्वी ठरले. त्यातून त्यांनी बावीस लाख रुपयांची रोकड लंपास केली. याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलीस वाहनाचा आवाज आल्यावर त्यांनी कटर व सिलिंडर जागेवरच सोडून वाहनाने पळ काढला. चोरटे दूरवर पळून जाऊ नये म्हणून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. ते जवळपासच लपून बसले असतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.