वर्धा : स्थानिक नसलेला तरीही उमेदवारी मिळालेला उमेदवार हा चांगलाच चर्चेत असतो. पक्षाचे कवचकुंडल घेऊन आलेला असा उमेदवार मग बाहेरचा किंवा ‘ पार्सल ‘ म्हणून हेटाळणीस पात्र ठरतो. असेच आता होवू घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत झाले आहे.
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघ
विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघाची निवडणूक होवू घातली आहे. त्यात वर्धा चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा समावेश आहे. यात भाजपतर्फे अरुण लखानी यांची उमेदवारी काल रविवारी जाहीर झाली आणि कोण हे लखानी या प्रश्नावर चर्चा सूरू झाली. पण भाजप वर्तुळस हे नाव अपरिचित नाहीच. कारण सुरवातीस केंद्रीय मंत्री Nitin Gadkari व नंतर मुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचे अत्यंत विश्वासू असा त्यांचा परिचय दिल्या जातो. पण गंमत अशी की ते गडकरी – फडणवीस या दोघांचेही विश्वासू असून प्रदेश भाजपचे ते सह कोषाध्यक्ष आहेत. म्हणजेच ते पक्षासाठी बाहेरचे नाहीत.
असा राहला इतिहास
हा विधान परिषद मतदारसंघ तीन जिल्ह्यामुळे चांगलाच चर्चेत राहला आहे. तीन जिल्ह्यातील नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांवार मोहिनी टाकू शकणारच आमदार होतो. या मतदारसंघात गत काही वर्षात तशी वाटचाल झाली. पण पूर्वी नव्हती. १९८२ ते १९८८ दरम्यान वर्धा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष जगन्नाथराव ढंगे, १९८८ ते १९९४ वसंतराव वानखेडे, १९९४ ते २००६ असे दोन टर्म दत्ता मेघे यांचे अनुयायी व वर्तमान भाजप नेते रामदास तडस आमदार झालेत. त्यानंतर जैनुद्दीन झवेरी, नीतेश भांगडिया व मावळत्या काळात दिवं. रामदास आंबटकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सर्व वर्धा किंवा चंद्रपूर याच जिल्ह्यातील.
पार्सल शब्द आणि लोकसत्ता
असा हा या मतदारसंघाचा इतिहास स्थानिक नेतृत्वास उमेदवारी मिळाल्याच राहिलं. पण याच नव्हे तर यापूर्वी स्थानिक सोडून इतरांना उमेदवारी देण्याचा प्रकार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत होऊन झाला आहे. अशी बाब पार्सल म्हणून चर्चेत आली ती लोकसत्तातून झालेल्या बातमीपत्रामुळेच. काँग्रेस नेते पी. व्हि.नरसिंहराव हे रामटेक व गुलाम नबी आझाद हे यवतमाळ येथून उभे झाले होते व निवडून पण आलेत. मात्र त्यावेळी विरोधी पक्ष भाजपने हे तर बाहेरचे अशी संभावना करणे सूरू केले आणि मर्मावर बोट ठेवत लोकसत्ताने ‘ पार्सल ‘ असा शब्द रुजू केला. आता परत तो चर्चेत आला.
लखानी हे पार्सल कां?
या विधान परिषद मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळालेले अरुण लखानी हे प्रामुख्याने चर्चेत आले ते बलाढ्य पवार कुटुंबाशी सोयरीक झाल्याने. त्यांचे पुत्र व सुप्रिया सुळे यांची कन्या विवाहबद्ध होणार. पण यामुळे त्यांची उमेदवारी नाही. ते MLC निवडणुकीचे भाजप उमेदवार झाले ते केवळ आणि केवळ गडकरी – फडणवीस स्नेहामुळे. मात्र असा स्नेह साधे वृत्तपत्र नं वाचणाऱ्या काही मतदार नगरसेवक यांना माहीतच नाही. म्हणून बाहेरचा, पार्सल, प्रवासी असा उल्लेख सूरू झाला आणि भाजपची गोची झाली आहे.
