Tukaram Mundhe FDA action Wardha : वर्धा: अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. वर्धा येथील मगनवाडी परिसरातील नामांकित संस्था असलेल्या मे. वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था (गोरस भंडार) या आस्थापनेवर प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ३१ मे रोजी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत तब्बल २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा संशयास्पद व असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, सदर आस्थापना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन

प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाला मिळालेल्या एका गोपनीय आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई आखण्यात आली होती. प्रशासनाचे नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राऊत व राहुल खंडागळे, तसेच वर्ध्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांच्या संयुक्त पथकाने मगनवाडी, वर्धा येथील ‘गोरस भंडार’च्या उत्पादन केंद्राला अचानक भेट देऊन कसून तपासणी केली.

या तपासणी दरम्यान सदर ठिकाणी अत्यंत असुरक्षित, अस्वच्छ आणि अन्न कायद्याच्या निकषांना हरताळ फासणाऱ्या वातावरणात अन्नपदार्थांचे उत्पादन होत असल्याचे पथकाला रंगेहात आढळून आले. उत्पादन करून बाजारात वितरित केले गेलेले सर्व अन्नपदार्थ तात्काळ ग्राहकांकडून व बाजारातून ‘रिकॉल’ (परत गोळा) करण्याचे आदेश पेढीला देण्यात आले आहेत. सदर धडक आणि यशस्वी कारवाई अन्न व औषध प्रशासन वर्धा विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले आणि नागपूर विभागाचे सह आयुक्त कृष्णा जयपुरकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ईशारा

या मोठ्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले की जनतेच्या आरोग्याशी होणारा कोणताही खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

पण दूध उत्पादक शेतकरी संतप्त.

गोरस भंडारची प्रतिमा मलीन करणा-या दोषी अधिका-यांवर कार्रवाईची मागणी.पीडित शेतक-यांनी दिले पालकमंत्री डॉ. भोयर यांना निवेदन. जिल्ह्याची ओळख असलेल्या व आपल्या सेवा व उत्पादनामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडार वर एफडीए ने केलेली कार्रवाई आकसपूर्ण असून संस्थेची प्रतिमा मिली करणारी आहे. या कार्रवाईमुळे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे.

त्यामुळे संबंधित दोषी अधिका-यांवर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतक-यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. परीक्षण होण्यापुर्वीच अधिका-यांनी भंडार मधील मालाल सील करून विक्री व उत्पादनावर बंदी घातली. नुमन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच अधिका-यांनी ठपका ठेवत ही कार्रवाई करणे कितपत योग्य आहे.

आमची तर गांधी परंपरा

महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून गोरस भंडारची मूर्हत मेढ रोवण्यात आली आहे. मागील 9 दशकांपासून गोरस भंडार आपली विश्वासर्हता कायम राखून आहे. संस्थेच्या गोरसपाक देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. आजपर्यंत ग्राहकांनी देखील संस्थेच्या उत्पादनाबाबत कधीच तक्रार केली नाही. मात्र एफडीएच्या अधिका-यांनी सूढबुद्धीन कार्रवाई केली. त्यामुळे गोरस भंडारला दुधाचा पुरवठा करणा-यांना दुग्ध उत्पादकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. अचानक दुध पुरवठा बंद झाल्याने दुध कुठे विकायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, चारा- दाण्याचे वाढते भाव व महागाई मुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

त्यात अशा प्रकारची कार्रवाई झाल्याने दुग्ध उत्पादकांचरूा जखमेवर मीठ चोळल्या गेले आहे. शेतक-यांच्या दुधाचे जागेवर कोणतेही परिक्षण न करता दुधाचा पुरवठा पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आला आहे. तथापि, या कार्रवाईमुळे विश्वासाचे प्रतिक असलेल्या संस्थेबात ग्राहकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. परिणामी ग्राहक शेतक-यांचे दुध खेरदी करणार नाही. अशा परिस्थिती मध्ये शेतक-यांनी आपले दुध कुठे विकायचे असा प्रश्न शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

गोरस भंडार वर सुडबुद्धीने व आकसापोटी कारवाई करणा-यां दोषी अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी गजानन लोखंडे, सुहास पाटील, सचिन टाके, दिलीपराव कोकाटे, बाबाराव गायकवाड, गोविंदराव डोळे, कमलाकर शेंडे, बाळकृष्ण राऊत, उमेश डाखाळे, शिवराम खडसकर, दशरथ मोहदुरे,मधुकरराव भोयर, गजानन उमाटे, अंकुश येंडे, विनोद नांदे, मधुकर टेकाळे, दिवाकर रोडे, पांडूरंग भुसारी, चंद्रशेखर कामडी,प्रमोद कामडी, श्रीराम मगर, तुकराम भुसारी यांच्यासह अनेक शेतक-यांनी केली आहे.