वर्धा : रस्त्यावर वाहतूक सूरू असतांना एका हरियाणातील ट्रॅकचालकाने बलात्कार करण्याचा केलेला प्रयत्न मुलीच्या सूचकतेने फसला. त्या धाडसाचे हे उदाहरण. शाळेतून घरी गावाकडे परतत असतांना घडलेला हा प्रकार खळबळ उडवून देणारा ठरला. घटना हिंगणघाट येथील आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आजनगाव मार्गावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत प्रथम छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला.रस्त्याच्या कडेला लघुशंकेच्या निमित्ताने उभा असलेल्या ट्रकचालकाने ही बळजोरी केली.ट्रकचालक छेडछाड करू लागला. तेव्हा हा प्रकार पाहून घाबरलेल्या सदर विद्यार्थिनीने आरडाओरड करीत आपली सुटका करवून घेतली. या प्रकारानंतर आरोपीने तेथेच उभ्या असलेल्या ट्रकमधून तेथून पळ काढला.घटनेची तक्रार प्राप्त होताच वडनेर पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत मोहम्मद नफिज मोहम्मद हारून(३२) या हरियाणा राज्यातील आरोपीला देवलापार येथे अटक केली. तसेच ट्रक क्र. आरजे -११/जिडी ३२५१ सह ताब्यात घेतले.
आजनगाव – कुटकी मार्गावर घडला हा प्रकार घडला.आरोपीने कुकर्म करण्याचे हेतूने तिला मागून पकडून रस्त्यालगतच्या शेताच्या बांधीत नेण्याचा प्रयत्न पण केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. पीडितेने जोरात आरडाओरड केल्याने आरोपी जवळच रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये बसून घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधित ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रार प्राप्त होताच ठाणेदार घनश्याम पाटील यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित तपास सुरू केला. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा करत संबंधित ट्रकचा शोध घेत आरोपीसह आरजे- ११ जीडी/३२५१ हा ट्रक ताब्यात घेतला. वडनेर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आरोपी मोहम्मद नफिज काही तासातच पोलिसांच्या हाती लागला. यासाठी पोलिसांनी महामार्गावरील एकूण ५ टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहिती घेतली.
महाराष्ट्र- मध्यप्रदेश राज्याचे सीमेवर असलेल्या देवलापार (नागपूर ग्रामीण) पोलिसांनी या आरोपीला तेथे ताब्यात घेतले.सदर प्रकरणी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत.

