लोकसभा निवडणुकीची मतमोजनी सुरू झाली असून यंदा कुण्या पक्षाला एकतर्फी विजय मिळेल असे वाटत नाही. यंदा भाजपला मोठो फटका बसेल असे विरोधी पक्षांना वाटते. महाराष्ट्रातील पक्षफुटी, बंड, तसेच सामाजिक प्रश्न, बेरोजगारी या सारख्या विषयांवर जनता देखील अस्वस्थ असल्याचे दिसून आले होते. याचा काही परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडेल असा अंदाज बांधण्यात येत होता. वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनाही हे प्रश्न भेडसावत होते. आज निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी याच प्रश्नांना वाचा फोडत निवडणुकीत यश मिळणाल असल्याचा विश्वास व्यक्त केला.

लोक दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला कंटाळले आहेत. निवडणुकीत कधी यांना फटाका देणार यासाठी लोक वाट पहात होते. याचे प्रतिबिंब आज निकालंमधून दिसून येईल. मतदार राजा जिंकेल असा विश्वास राष्ट्रावादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा – भाजपाला झटका? सकाळच्या सत्रात राज्यात महायुती पिछाडीवर, मविआ पुढे

वर्धेत अमर काळे यांची थेट लढत भाजपचे दोनवेळचे खासदार रामदास तडस यांच्याशी होती. तडस यांनी २०१४ आणि १९ च्या लढतीत काँग्रेसला पराभूत करत वर्धा लोकसभा मतदारसंघ सर केला होता. यंदा आपली त्यांच्याशी लढत असताना तडस यांच्यामुळे आपले काम हलके झाले अशी प्रतिक्रिया अमर काळे यांनी दिली.

रामदास तडस यांची त्यांच्या कार्यकाळात जनतेशी नाळ तुटली, दहा वर्षांमध्ये त्यांचा चेहरा आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक सांगत होते, त्यामुळे तडस यांनी माझे काम हलके केले. त्यांच्याविषयी माझी नाराजी तर आहेत, लोकांचीपण आहे. या सरकारपासून सुशिक्षित वर्ग, महिला, तरुण कोणीही समाधानी नाही. नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया अमर काळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – महाराष्ट्रातल्या पक्षफुटीचा नेमका फायदा कोणाला? सर्वाधिक नुकसान अजित पवारांचं?

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असा विश्वास रामदास तडस यांनी व्यक्त केला. निवडणूक प्रकिक्रिया. गेल्या दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक त्रासाची ठरली असेही ते म्हणाले होते. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकाला भाव इत्यादी विषयांमुळे यंदाची लोकसभा निवडणूक गाजली. आज निकालामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.