वर्धा : सध्या उन्हाळा आणि आंब्याची रेलचेल. पाहुणचार तो आंब्याचा रसाचा. शिवाय विविध आंब्याचे वाण असल्याने खाण्याची चंगळ. पण हे बाजारात शहरी ग्राहकांसाठी आलेले आंबे कितपत सुरक्षित, याची खतरजमा कशी करणार हा प्रश्नच असतो. म्हणून पाडाचा, घरी पीकविलेला आणि चर्चेत असलेला रासायनिक पदार्थाने पीकविलेला आंबा असे प्रकार सांगितल्या जातात.
मार्गदर्शक तत्व
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंबा नैसर्गिकरीत्या आणि सुरक्षितपणे पिकवण्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.
सुरक्षित पद्धत: इथिलीन गॅसचा वापर (Ethylene Gas)
इथिलीन हे फळांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे संप्रेरक (Hormone) आहे, जे फळ पिकवण्याची प्रक्रिया सुरू करते.इथिलीनचे प्रमाण, आंबा पिकवण्यासाठी १०० ppm (100\mu l/L) पर्यंत इथिलीन गॅसचा वापर करण्यास परवानगी आहे.तापमान आणि आर्द्रता पण निश्चित आहे. आंबा पिकवण्यासाठी २०-२२°C तापमान आणि ९०-९५% सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity) असणे आवश्यक आहे.
किती वेळ
- या प्रक्रियेसाठी साधारणपणे २४ ते ४८ तास लागतात.सॅचेट (पाऊच) वापरण्याची पद्धत. इथिलीन तयार करणारे पाऊच (सॅचेट) ५-१० सेकंद पाण्यात बुडवून घ्या. हे ओले पाऊच छिद्र असलेल्या एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. हा डबा आंब्याच्या पेटीच्या मध्यभागी ठेवा (साधारण १० किलो फळांसाठी एक पाऊच).
- २४ तासांनंतर हे पाऊच पेटीतून काढून टाका. नैसर्गिकरीत्या आंबा पिकवण्याच्या पद्धती (घरगुती).जर तुमच्याकडे पिकवण्याची यंत्रणा नसेल, तर खालील नैसर्गिक पद्धती वापरून ४-६ दिवसांत आंबे पिकवता येतात. प्रत्येक आंबा स्वतंत्रपणे कागदात गुंडाळून ठेवा किंवा कागदी पिशवीत ठेवा.
- पेंढा किंवा गव्हाचा भुसा उपयोगात येतो. न पिकलेले आंबे भाताच्या पेंढ्यावर किंवा गव्हाच्या भुशावर थरांमध्ये रचा. आंबे हवाबंद तांदळाच्या डब्यात किंवा कोठीत ठेवूनही पिकवता येतात.
महत्त्वाच्या सूचना
कॅल्शियम कार्बाइडवर बंदी आहे. ‘कार्बाइड’ किंवा ‘मसाला’ वापरून आंबे पिकवणे भारतात पूर्णपणे प्रतिबंधित (Banned) आहे. यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश असतात, ज्यामुळे चक्कर येणे, तहान लागणे, जळजळ होणे आणि उलट्या होणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. इथिलीन गॅस निर्माण करणारा कोणताही स्त्रोत (उदा. सॅचेट) फळांच्या थेट संपर्कात येऊ नये.ज्या आंब्यांच्या सालीवर काळे डाग (Black blotches) आहेत ते खरेदी करणे टाळा, कारण ते कार्बाइडने पिकवलेले असण्याची शक्यता असते. आंबा खाण्यापूर्वी पिण्याच्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावा.आंबा पूर्णपणे परिपक्व (Mature) झाल्यावरच झाडावरून काढावा, जेणेकरून तो उत्तम पिकतो.
खबरदारी
मात्र या काळजीसह आंबा बाजारात विक्रीस येत असेल, याची खात्री काय, अशी शंका व्यक्त होते. म्हणून केवळ ठोकच नव्हे तर अन्न सुरक्षा म्हणून आंबे विक्रेत्यांना परवाना घेणे आवश्यक ठरले आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन उपायुक्त टोपले यांनी ठोक आंबे विक्रेत्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यात त्यांना आंबा कोणता विकावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांनी किरकोळ किंवा बंडीवर आंबे विकणाऱ्यास काय सूचित करावे याचे मार्गदर्शन करावे, याबाबत अवगत करण्यात आले. यापुढे अश्या किरकोळ विक्रेत्यांना पण परवाना आवश्यक ठरणार, असे या खात्याने स्पष्ट केले आहे.गैर आढळून आल्यास प्रसंगी फौजदारी गुन्हे पण दाखल होणार आहे.
