वर्धा : दुरांतो ही Super Fast दीर्घ पल्ल्याची तसेच अन्य दोन गाड्यांचे थांबे सूरू करण्याचे पत्र रेल्वे मंडळाने काढले.दुरांतो थांबणार म्हणून कोण आनंद झाला, ती विचारायची सोय नाही. पण हा आनंद कोणाच्या प्रयत्नाने मिळणार, याचे श्रेय घेण्याची सूरू झालेली चढाओढ चर्चेत आली आहे. रेल्वेमंत्री असतांना ममता बॅनर्जी यांनी देशभरात दुरांतो या अतिजलद गाड्या सूरू केल्या होत्या. त्या प्रवासीप्रिय झाल्या. म्हणून या गाडीचा आपल्या गावी थांबा असावा म्हणून मागणी होत गेली. वर्ध्यातून ती मागणी झालीच.
थांब्याचे पत्र
नागपूर – मुंबई – नागपूर या दुरांतो गाडीस वर्धा स्थानकवर थांबा मंजूर तसेच विदर्भाची पंढरी शेगाव येथे लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशा या एक्स्प्रेस गाडीचा थांबा व पूणे जिल्ह्यातील उरळी येथे विविध तीन गाड्यांचा थांबा मंजूर झाला. तूर्तास प्रायोगिक ( Experimental Basis ) तत्ववर या हे थांबे असून त्याची लवकरच अंमलबजावणी होणार. प्रवासी लाभल्यास थांबे कायमस्वरूपी होणार, असे Relway Board उपसंचालक रणधीरकुमार मिश्रा यांनी पत्रातून जाहीर केले. पत्रासह ही आनंदवार्ता जाहीर केली ती भाजपचे Media सल्लागार व मध्य रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य प्रणव जोशी यांनी.
पत्र प्रसिद्धी
रेल्वेचे थांबा मंजुरीचे पत्र २७ मार्चचे आहे. त्यास प्रणव जोशी यांनी ३ एप्रिल रोजी प्रसिद्धीस दिले. ही जनतेस मिळालेली पहिली वार्ता. त्याच दिवशी खासदार अमर काळे यांच्या कार्यालयाने ही गाडी सूरू झाल्याचे कळविले व श्रेय काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना असल्याचे सूचित केले. आणि वाद आरंभला. जोशी म्हणतात की २७ मार्च रोजीचे हे पत्र लोकसभा अधिवेशन सूरू असतांना निघाले. त्याची माहिती सर्वप्रथम खासदारांनाच मिळते. ती माहिती त्याच वेळी आज श्रेय घेणाऱ्यांना सांगता आली असती. पण ती बाब सोडा. याच दुरांतो गाडीचे नव्हे तर अन्य काही गाड्याबाबत त्यावेळचे भाजप खासदार रामदास तडस यांनी प्रश्न उपस्थित केला होता, असे जोशी निदर्शनास आणतात.
मुख्यमंत्री कार्यालय
Duranto व अन्य गाड्यांचे थांबे विदर्भात मंजूर करण्याबाबत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयास पत्र दिले होते. २ मार्च २०२४ रोजीच्या या पत्रात दुरांतो व अन्य ७ गाड्याबाबत फडणवीस यांनी विनंती केली आहे. रामदास तडस यांनी दिलेल्या या पत्रावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पत्र दिले. तसेच आता मुख्यमंत्री झाल्यावर पण देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्याचे तडस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. Duranto गाडीचा वर्धा थांबा आमच्याचमुळे हे यातून स्पष्ट होत असल्याचे भाजप म्हणते. तसे पोस्टर्स लगेच वर्धा स्थानकावर लागले पण.
खासदार अमर काळे
पण Duranto गाडीचा वर्धा थांबा मंजूर झाला तो आमच्याचमुळे असा दावा लगेच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी केला. त्यांच्या कार्यालयाने त्याचा पुरावा म्हणून काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पत्र सादर केले. खासदार धानोरकर यांनी २३ मार्च २०२६ रोजी रेल्वे मंत्री Ashvin Vaishnav यांना दिलेल्या या पत्रातून पहिली मागणी Rajdhani express या गाडीचा थांबा चंद्रपूर येथे देण्यात यावा, अशी आहे. तर दुसरी मागणी दुरांतो गाडीचा वर्धा येथे २ मिनिटाचा थांबा देण्याबाबत आहे. याच पत्रामुळे थांबा मिळाल्याचा दावा खासदार काळे करतात. खासदार धानोरकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन ही गाडी रेल्वे मंत्र्यांनी सूरू केली असून त्याचा लाभ वर्धा व अन्य जिल्ह्यांना होणार असल्याचे स्पष्ट केले.
खरे काय
Duranto Express गाडीचा थांबा कुणामुळे मिळाला, याबाबत दोन्ही बाजूने पत्र देत दावे प्रतिदावे सूरू झाले. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यच्या विनंतीस महत्व की विरोधी पक्षाच्या खासदारच्या पत्रास महत्व असते, हे लोकं ठरवतील, असा टोला भाजप नेते हाणतात. तसेच आता आणखी एका गाडीचे थांबे मिळणार भाजप नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळणार आहे. विरोधकांनी ती गाडी कोणती हे आताच सांगून टाकले तर बरे, असाही सल्ला देण्यात येतो.
