वर्धा : पवनगाव पंचक्रोशीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघीणीस कसे पकडायचे हा मोठा पेच वन खात्यास पडला होता. शेतकरी जायबंदी झाल्याने मोठे आव्हान उभे झाले आणि आमदार समीर कुणावार यांना थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे धाव घ्यावी लागली. पकडण्याचे निर्देश झाले. पण वाघीण नेमकी कुठाय हे ट्रॅप कॅमेऱ्यात पण गवसत नव्हते. पण प्रयत्न अखेर सार्थकी लागलेच.

अनेक जनावरे ठार

तालुक्यातील पवनगाव (करूळ) परिसरात वाघीनीने दहशत निर्माण करून अनेक जनावरांना ठार केले होते. ८ सप्टेंबरला पवनगाव येथील विशाल मून याच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.तर ९ सप्टेंबरला शेतपिक सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता .यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेवटी १८ दिवसांनंतर अथक परिश्रमानंतर २९ सप्टेंबरला पहाटे ५.३० वाजता या हल्लेखोर वाघीणीला पकडण्यात वनविभागाच्या टिमला यश मिळाले आहे.वाघ पकडण्याची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी पवनगाव गाठून वनविभागाच्या टिमचे कौतुक करीत अभिनंदन केले.

यांची होती चमू

या हल्लेखोर वाघीणीला जेरबंद करण्याची परवानगी मिळताच उपवनसंरक्षक हरविर सिंग, यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसरक्षक हरीष सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे सह चंद्रपूर जिल्ह्यातील पथक युद्ध पातळीवर पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या हल्लेखोर वाघांनी पासुन लवकरात लवकर सुटकारा द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी शेतमजूर नागरिकांकडून करण्यात येते होती.शेवटी वनविभागाच्या टिमला या वाघीणीला पकडण्यात मोठे यश आले आहे.वाघीण पकडण्याची माहिती मिळताच आमदार समिरमात्र याच परिसरात असलेल्या पुन्हा एका वाघाला पकडण्याचे आव्हान वनविभागाच्या पुढे अजूनही कायम आहे. वाघीणीला पकडण्याची प्रक्रिया उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसरक्षक हरीष सरोदे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे,प्रणव जोशी ,डॉ मेघराज तुलावी,प्रणित सुर, अभिशेख खेडुलकर पिपल्स फार्र ॲनिमल्स वर्धा,श्रेत्रसाय्यक चौधरी,श्रेत्रसाय्यक डेहनकर, वनरक्षक हिवरकर, वनरक्षक लोमेश गोहन, पिसे, रमेश चौके, समिर वाघ,शेशिकांत शेंदरे, पटेल,वादले,रोशन उईके,रोशन कुत्तमारे,आर आर टीचे पथक आदिसह संपूर्ण समुद्रपुर वनपरिक्षेत्रातील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

समीर कुणावार म्हणतात…

शेतकऱ्यांचे हित जपणे महत्वाचे. आता वाघीण पकडल्या गेल्याने परिसराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या परिसरात वाघ संख्या वाढत आहेच. त्या दृष्टीने काही ठोस करण्याचा विचार सूरू आहे, असे आमदार कुणावार म्हणतात.