वर्धा : Market Committee In the election Result बाजार समितीच्या आज झालेल्या निवडणूकीत वर्धा, सेलू व देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून भाजपचा मात्र पराभव झाला आहे. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वात या आघाडीने मजल मारली असून देशमुख यांचे चिरंजीव डॉ.संदीप देशमुख यांनी सर्वप्रथम विजय नोंदविला. वर्धा बाजार समितीत १८ पैकी १० जागांवर आघाडीचे उमेद्वार विजयाच्या टप्यात असून उर्वरीत जागांवरसुध्दा आघाडीचे उमेद्वार घौडदौड करीत आहे.

सेलू बाजार समितीत १८ पैकी १५ जागांवर आघाडीचे उमेद्वार निवडून आले आहे. या ठिकाणी प्रा.देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांच्या संयुक्त आघडीने बाजी मारली. देवळीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आले. अठरा पैकी सोळा जागांवर निवडून आले असून दोन अविरोध जागा याच आघाडीकडे आहेत. या तीनही ठिकाणी भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांनी ताकद लावली होती.पण मतदारांनी त्यांना नाकारले आहे.

utkarsha rupwate-resigns from congress
शिर्डीत महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवतेंनी दिला राजीनामा, वंचितच्या तिकिटावर लढणार?
sangli lok sabha seat, Congress Workers, Dissolve Miraj Taluka Committee, Protest Over Sangli Seat Allocation, miraj taluka news, miraj taluk congress, vishwajit kadam, maha vikas aghadi, uddhav thackarey shivsena,
मविआमध्ये बंडखोरीची हालचाल, तालुका समिती बरखास्त, फलकावरील नाव पुसले
mva press conference seat sharing for loksabha election 2024
सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?
Illegal Liquor Sale, Wardha, Collector, Suspends License, liquor store, lok sabha 2024, Elections, marathi news,
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्री, निवडणूक काळात…..