scorecardresearch

Premium

नागपूर : “उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग करणार”, ओबीसी आक्रमक

सरकारने आम्हाला सात दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्यांना वेळ दिला आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. किती काळ प्रतीक्षा करायची, यालाही मर्यादा आहेत, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

OBC Federation Nagpur
नागपूर : “उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग करणार”, ओबीसी आक्रमक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी लेखी हमी राज्य सरकारने द्यावी, त्यासाठी मंत्रालयात तातडीने ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी, यासाठी आम्ही सरकारला रविवारपर्यंतची वेळ देत आहोत. सरकारने सकारात्मक पाऊल न उचल्यास सोमवारी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी बेमुदत उपषोण करतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी आज दिला.

चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. नागपुरात बेमुदत उपोषण सुरू झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजबांधव सहभागी होतील. सरकारने आम्हाला सात दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्यांना वेळ दिला आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. किती काळ प्रतीक्षा करायची, यालाही मर्यादा आहेत, असे डॉ. तायवाडे म्हणाले.

Avinash jadhav protest
“आज गांधीसप्ताह संपणार, उद्यापासून…”, टोल दरवाढीवरून मनसेचा इशारा, “आमच्या हाताची भाषा…”
sudhir-mungantiwar
“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
buldhana
मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले
Eknath Shinde Manoj Jarange Ajit Pawar
“आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…”

हेही वाचा – अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. ओबीसींची मंत्रालयात येत्या आठ दिवसांत बैठक बोलावण्यात येईल. ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आता फडणवीस यांनी शब्द पाळावा, त्यासाठी त्यांना रविवारी पर्यंतची वेळ देत आहोत, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन केले जाईल, असा इशाराही तायवाडे यांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Warning to eknath shinde and devendra fadnavis from obc federation in nagpur rbt 74 ssb

First published on: 21-09-2023 at 12:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×