Premium

दहशतीच्या सावटाखाली ‘त्या’ने गाठली यशाची वाट; वाचा यूपीएससीत सातवा रँक मिळवणाऱ्या वसीमची प्रेरणादायी कथा

दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या नयनरम्य प्रदेशाचा रहिवासी असलेला वसीम अहमद भट याने यूपीएससीत संपूर्ण देशातून सातवा क्रमांक पटकवला.

Waseem Bhat south kashmir secured seventh rank country UPSC
दहशतीच्या सावटाखाली ‘त्या’ने गाठली यशाची वाट; वाचा यूपीएससीत सातवा रँक मिळवणाऱ्या वसीमची प्रेरणादायी कथा (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: चारही बाजूला दहशतीचे वातावरण. कधी, कुठे गोळीबार होईल आणि जीव गमवावा लागेल याचा काही नेम नाही. अशा दहशतीच्या अंधारातही स्वतःच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वसीम अहमद भट याने यशाची वाट गाठली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात त्याने ऑल इंडिया सातवा रँक मिळविला आहे. जम्मू आणि काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील वसीम सध्या उपराजधानीतील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे प्रशिक्षण घेत आहे.

हेही वाचा… नागपूर : “ती” मान्सूनपूर्व पावसाचीच वर्दी; विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मेपर्यंत पावसाचा तडाखा

दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या नयनरम्य प्रदेशाचा रहिवासी असलेला वसीम अहमद भट याने यूपीएससीत संपूर्ण देशातून सातवा क्रमांक पटकावित उपराजधानीतील एनएडीटीला प्रशिक्षण घेतोय. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली आहे. त्याने दिल्ली येथे राहून यूपीएससीची तयारी केली. २०२०मध्ये यूपीएससीसाठी पहिला प्रयत्न केला. त्यात अपयश आले. त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये दशहतवाद्यांचा विळखा असलेल्या प्रदेशात राहून प्रयत्न केला आणि यश मिळाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 13:40 IST
Next Story
नागपूर : कोराडी वीज प्रकल्पाला विरोध, सुनावणी सुरू होण्यापूर्वीच तणाव; पोलीस बंदोबस्तात सुनावणी सुरू