नागपूर  : फुटाळा तलावातील पाण्यातून गुंजणारे सप्तस्वर, पाण्याचा थुई-थुई नाच व  रंगसंगतीमुळे तलावात निर्माण होणारा इंद्रधनुष्याचा भास  आदीचा समावेश असलेल्या संगीत कारंजीने  सी-२०  साठी नागपुरात आलेल्या देश- विदेशातील प्रतिनिधींना भुरळ पाडली. फटाक्यांच्या आतषबाजीने येथील परिसर निनादून गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या प्रमुख उपस्थितीत या  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सी-20 परिषदेच्या आयोजन समितीचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त  राधाकृष्ण बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

कारंजीच्या माध्यमातून तयार झालेल्या पाण्याच्या पडद्यावर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात   नागपूरचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला. जगविख्यात संगीतकार ए.आर.रहेमान यांच्या संगीत संयोजनाने सजलेल्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यानंतर  फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water beat of music foreign visitors impressed world famous fountain in nagpur cwb 76 ysh
First published on: 20-03-2023 at 22:12 IST