scorecardresearch

Premium

अमरावती विभागात २५ गावांना टँकरने पाणीपुरवठा; १० मोठ्या‎ प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ४१.९८ टक्के जलसाठा उपलब्ध

मोसमी पावसाच्या आगमनाची महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत अमरावती विभागात जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे.

Water supply
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

अमरावती : मोसमी पावसाच्या आगमनाची महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत अमरावती विभागात जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. २५ गावांसाठी २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महिनाभरात अकरा टँकर वाढले आहेत. सर्वाधिक १७ टँकर बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहेत.

अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्यात चिखलदरा तालुक्यात तीन ठिकाणी आणि चांदूर रेल्वे तालुक्यात एका ठिकाणी टँकर सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १६ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा व देव्हारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय सावरगाव माळ (सिंदखेडराजा), पोखरी, तपोवन (मोताळा), वरवंड (मेहकर), धोडप, डोंगरशेवली (चिखली), किनगाव जट्टू (लोणार) या गावातही टँकर सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये तर वाशीम जिल्ह्यातील एका गावाला टँकरने पाणी पुरवले जात आहे.

mhada houses thane
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ
district hospital
प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा रुग्णालय’ स्थापन करण्याची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना!
Jejuri Gad
जेजुरीच्या खंडोबा गडाला प्राप्त होणार ऐतिहासिक वैभव, विकास आराखड्यातून दुरुस्तीचे काम वेगात
Illegal hoardings, Special Campaign by BMC, BMC Commissioner iqbal singh chahal, BMC on illegal hoardings, illegal hoardings removed by Mumbai Municipal Corporation
प्रशासकीय कारभारात प्रकल्पांचे खर्च दुप्पट; मुंबई महापालिकेच्या कामकाजावर संशय

हेही वाचा – मुंबईत फडणवीस – ठाकरे भेट, नागपुरात भाजपाकडून मनसेला खिंडार

पश्चिम विदर्भातील १० मोठ्या‎ प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ४१.९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.‎ सर्वाधिक ४६५.९९ दलघमी जलसाठा यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणात, त्या खालोखाल २५० दशलक्ष घनमीटर जलसाठा अमरावती ‎जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात, तर ‎सर्वात कमी म्हणजे १०.२० दलघमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात‎ आहे.‎

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply by tanker to 25 villages in amravati division mma 73 ssb

First published on: 31-05-2023 at 12:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×