लोकसत्ता टीम

चंद्रपूर : संरक्षित क्षेत्रांबाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे, याचा अतिशय आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर येथे चिंतन आाणि मंथन केले. चंद्रपूर येथे तज्ज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतूनच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…

येथील वन अकादमीत ‘वाईल्डकॉन-२०२५’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (व्यवस्थापन) एम.एस.राव, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, माजी मंत्री शोभा फडणवीस आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..

मानवाने प्राण्यांच्या जागेत अतिक्रमण केले, की प्राण्यांनी आपल्या जागेवर, हा संशोधनाचा विषय आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढली असून मानवी लोकसंख्यादेखील प्रचंड वाढली आहे. जमीन मात्र मर्यादितच आहे. शिवाय वनक्षेत्रात विकासकामे होत आहे. यामुळे प्राण्यांचे अधिवास क्षेत्र कमी झाले. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचे निदर्शनास येते. मानवासह वन्यजीवही जगले पाहिजे. त्यामुळे या विषयावर इतर देशांनी काय उपाययोजना केल्यात, त्याचा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, अशी सूचना वनमंत्र्यांनी यावेळी केली.

चंद्रपुरातील व्याघ्रपर्यटन प्रकल्पाला अतिक गतीने समोर नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल. स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा पर्यटनाचे शुल्क कमी करता येईल का, याबाबत अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. दोन दिवसीय चर्चासत्रादरम्यान मांडण्यात आलेल्या प्रत्येक समस्या सोडवण्यात येतील. निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री नाईक यांनी दिली. यावेळी त्यांनी बांबूपासून बनवलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनीलाही भेट दिली.

आणखी वाचा-आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

जनजागृती आवश्यक

पर्यटकांनी वन्यप्राण्यांशी कसे वागावे, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले की ते आनंदी होतात. चित्रफिती, छायाचित्रे कुटुंबीयांसह मित्रांना दाखवतात. समाज माध्यमांवर प्रसारित करतात. आता व्यावसायिक स्पर्धेतून असले प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे जनजागृती गरज आहे. जंगलात वाघांच्या गरजा भागत नाही, म्हणून ते मानवी वस्तीत शिरतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या त्यांच्याच अधिवासात गरजा पूर्ण व्हाव्या, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ते ‘वाईल्डकॉन-२०२५’ परिषदेसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर आणि आपले कर्तव्य विसरता कामा नये. पर्यटकांनीही वन्यप्राण्यांशी कसे वागावे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे नाईक म्हणाले.

Story img Loader