सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छेने शरीरविक्रय करणे हे बेकायदा नाही. त्यामुळे अशा व्यक्तीवर पोलिसांना कारवाई करता येणार नाही, असा निर्वाळा दिल्याने गेल्या वर्षांपासून नागपूर पोलीस आयुक्तांच्या कारवाईला सामोरे जात असलेल्या इतवारीतील प्रसिद्ध गंगा-जमुना या वारांगणाच्या वस्तीवर वारांगणांनी आज गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
नागपूर येथे इतवारी भागात गंगा-जमुना नावाने वारांगणाची वस्ती आहे. या वस्ती इतिहास जुना आहे. परंतु अमितेश कुमार हे नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाल्यानंतर येथे शरीरविक्रय करणाऱ्या वारांगणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. या वस्तीवर चोवीस तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईविरुद्ध अनेकदा वारांगणांनी आंदोलन केली. या आंदोलनाला ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी सातत्याने साथ दिली. परंतु पोलिसांच्या कारवाई विरुद्ध कोणीही साथ दिली नाही. अखेर सर्वोच्च न्यायलायाने एका प्रकारणात निर्वाळा दिला. त्याचे जोरदार स्वागत आज वारांगणाच्या वस्तीमध्ये दिसून आले. यावेळी ज्वाला धोटे म्हणाल्या, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करतो. गेल्या एक वर्षापासून वारांगणा माता बहिणींनवर व त्यांच्या निष्पाप लेकरांवर नागपूर पोलीस आयुक्तांनी जो अमानुष अत्याचार करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली त्यांचा आम्ही निषेध करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा