नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक स्वायत्त संस्था असून दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांद्वारे अधिकाऱ्यांची निवड करते. मात्र या संस्थेच्या कामात पारदर्शकता नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. अशा सर्व समस्यांमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडते. अशाच प्रकारच्या चुकांमुळे चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, असा आरोप स्टुडंट इस्लामिक संघटनेने येथे पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा – पुण्याची जागा काँग्रेसकडेच राहणार – विजय वडेट्टीवार




एमपीएससीने २०२०च्या संयुक्त अराजपत्रित परीक्षा घेतली. याचा २०२१ ला पेपर घेण्यात आला. त्यातही गोंधळ झाला असा आरोप संघटनेने केला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा पत्रही समाजमाध्यमांवर लिक झाले होते. अशा अनेक चुकांमुळे १ मे रोजी बीड जिल्ह्यातील अक्षय पवार, १५ मे रोजी परभणी येथील विजय नागोरे आणि गंगाखेड जिल्ह्यातील केदाळे दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येमुळे प्रकरणाची गांभीर्यता लक्षात येते. आयोगाने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी स्टुडंट इस्लामिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद झिया उर रहमान आणि सचिव मोहम्मद सैफ उल इस्लाम यांनी केली.