scorecardresearch

Premium

“आयोगावर दबाव आणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना घोषित करा”, आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी; म्हणाल्या…

आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हे सरकार घाईघाईत केवळ मराठा आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव आणत आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Yashomati Thakur on Maratha reservation
"आयोगावर दबाव आणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना घोषित करा," आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी; म्हणाल्या… (image – loksatta team/indian express/loksatta graphics)

अमरावती : आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हे सरकार घाईघाईत केवळ मराठा आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव आणत आहे. राज्य सरकारच्या या दडपशाही विरोधात अर्धन्यायिक अधिकार असलेल्या या संवैधानिक संस्थेच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. वास्तविक जातनिहाय जनगणना हाच राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा आहे. त्यामुळे सरकारने जातनिहाय जनगणना घोषित करावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, राज्य सरकारचे डोके ठिकाणावर नाही. या सरकारला जातीजातींमध्ये भांडण लावायचे आहे. जातनिहाय जनगणना या अधिवेशनात सरकारने घोषित करावी, अशी आमची मागणी आहे. या प्रश्नासंदर्भात सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आम्ही यायला तयार आहोत. मात्र, लोकांची फसवणूक सुरू आहे. जातनिहाय जनगणना करावी आणि मराठा समाजाला शाश्वत आरक्षण द्यावे. तसेच इतर घटकांना त्यांच्या संख्येप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे. हीच भूमिका राज्य मागासवर्ग आयोगाची आहे. त्यामुळे त्यांना समाजातील सर्व घटकांचे जात निहाय सर्वेक्षण करू द्यावे, काही विशिष्ट समाजांचे सर्वेक्षण केल्याने प्रश्न सुटणार नाही कोणत्याही समाजाला तात्पुरता दिलासा देऊन त्याची फसवणूक करू नका.

Statements of OBC leaders about Maratha reservation are only for political talk says Chandrakant Patil
मराठा आरक्षणाविषयी ओबीसी नेत्यांची विधाने राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात – चंद्रकांत पाटील
devendra fadnavis received sindhu art gallery in nagpur proposal for approval
“नागपुरात १४० कोटींची सिंधू आर्ट गॅलरी”  काय म्हणाले देवेंद्र फडणवीस….
Gyanvapi
“ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या ताब्यात द्या’, केंद्रीय मंत्र्याचे मुस्लीमांना आवाहन; म्हणाले, “सलोखा राखण्यासाठी…”
Controversial question in Maratha survey questionnaire asking dowry while arranging marriage Nagpur
लग्न जुळवताना हुंडा मागता का? मराठा सर्वेक्षणासंबंधी प्रश्नावलीत वादग्रस्त प्रश्न

हेही वाचा – सावधान! लग्नसमारंभ, वाढदिवस कार्यक्रम आयोजित करताय? तर मग हे वाचाच…

हेही वाचा – ‘सह्याद्री’वर सोयाबीन-कापूस प्रश्नावर बैठक; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री फडणवीसांसमवेत तुपकरांची चर्चा

जातनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी मांडली आहे. त्यामुळे सरकारने या अधिवेशनात जातनिहाय जनगणना घोषित करावी आणि कोणत्याही न्यायिक संस्थेवर कसलाही दबाव आणू नये, असेही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What congress leader yashomati thakur said on state backward classes commission and maratha reservation mma 73 ssb

First published on: 10-12-2023 at 15:33 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×