scorecardresearch

Premium

‘‘राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे…”, रुग्णालयातील मृत्युसत्राबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? वाचा…

काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

devendra Fadnavis comment patients death
‘‘राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे…”, रुग्णालयातील मृत्युसत्राबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? वाचा… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अकोला : खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येवरील रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवले जातात. संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्ये सरासरी होणाऱ्या मृत्यूंनाच मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. हा प्रकार अहोरात्र झटणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

अकोल्यात महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, नांदेड येथे गंभीर घटना घडली. त्याला कमी लेखले जाऊ शकत नाही. वास्तव समजून घेण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयातील मृत्यूशय्येतील रुग्ण सर्रास शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवले जातात. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कधीच नाकारले जात नाही. शासकीय रुग्णालयातील मृत्यूमधील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयातून आलेलेच असतात. ही परिस्थिती दिसून आली. आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज आहेच. मात्र, शासकीय रुग्णालयात अहोरात्र कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आरोप करणे अयोग्य आहे. काही कमतरता असल्यास ती दूर केली जाईल.

farmer protest
शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?
dog
कुत्र्याला अमानुष मारहाण; प्राणी संरक्षण कायद्यात बदल होणार?
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
pune, health minister, maharashtra budget 2024,
आरोग्यासाठी पाठवा पत्रे! जन आरोग्य अभियानाकडून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना मोहीम

हेही वाचा – पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…

आरोग्य यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. एक जरी मृत्यू झाला तर तो काळजीचा आहे. मृत्यू आपण थांबवू शकत नाही. रुग्णाला योग्य उपचार व औषध मिळाले की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. ३० टक्के औषधांची खरेदी स्थानिक पातळीवरून केली जाते. प्रामुख्याने लागणारे औषधे सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. आगामी काळात अग्रीम स्वरुपात औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र काही लोक राजकीय स्वार्थासाठी तयार करीत आहेत. शासकीय डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचे काम त्यांनी करू नये, असेदेखील फडणवीस यांनी नमूद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What did deputy cm devendra fadnavis say about the patients death in the hospital ppd 88 ssb

First published on: 07-10-2023 at 15:05 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×