वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली आहे. योजनेच्या माध्यमातून देशातील ३० लाख कारागिरांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.

सुतार, लोहार, नाभिक, चर्मकार, सूर्वणकार, कुंभार, गवंडी, शिंपी, धोबी अश्या देशभरातील १४० जाती समूहांना योजनेचा लाभ मिळेल. या कार्यक्रमात कारागिरांना आवश्यक ते प्रशिक्षण तसेच निधी नसलेल्यांना सरकारी आर्थिक सहाय्य मिळेल. ग्रामीण कारागिरांना एक लाख रुपयांचे स्वस्त दरात कर्ज मिळणार. पहिल्या एक लाख रुपयांचा परतफेड कालावधी १८ महिन्यांचा तर दुसऱ्या दोन लाख रुपयांचा परतफेड कालावधी ३० महिन्यांचा असेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – अकोला : कारमध्ये कोंबून गायींची तस्करी; नाकाबंदीदरम्यान उघडकीस आला धक्कादायक प्रकार

कौशल्य मूलभूत प्रशिक्षण ४० तासांचे तर दुसरे प्रगत प्रशिक्षण १२० तासांचे मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत रोज ५०० रुपयांचे मानधन मिळणार. योजनेसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही कारागिरांना सुवर्णभेट असल्याचे खासदार रामदास तडस म्हणाले. योजनेच्या प्रक्षेपण सोहळ्यात ते बोलत होते.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात ३०२ ‘एक गाव, एक गणपती’; १७३२ मंडळांमध्ये गणपतीची स्थापना

यावेळी आ. डॉ. पंकज भाेयर, दादाराव केचे, समीर कुणावार, उपेंद्र कोठेकर, राजेश बकाने, सुनील गफाट, सुधीर दिवे, वैशाली येरावार व अन्य सहभागी झाले होते. लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, अधिवास व जात प्रमाणपत्र, बँक खाते, पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

Story img Loader