नागपूर : जागतिक कीर्तीच्या मान्यवरांना डी.लिट. मानद पदवीने गौरवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गुरुवारी आपल्या शतकोत्तर वर्षात पाऊल ठेवणार आहे. या विद्यापीठाने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसह अनेक नामवंतांनाडी.लिट. पदवीने सन्मानित केले आहे.

४ ऑगस्ट १९२३ ला नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. ४ ऑगस्ट २०२३ ला नागपूर विद्यापीठ आपली शंभर वर्षे पूर्ण करणार असून गुरुवारपासून विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्षाला सुरुवात होणार आहे. विद्यापीठाने समाजातील मान्यवरांचा वेळोवेळी गौरव केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना १९४३ मध्ये वाङ्मय पंडित ही पदवी देऊन गौरवण्यात आले. पं. जवाहरलाल नेहरू यांना १९५० मध्ये कायदे पंडित ही पदवी बहाल करण्यात आली. याशिवाय विजया लक्ष्मी पंडित, लोकनायक एम. एस. अणे, इंदिरा गांधी, बाबा आमटे, लता मंगेशकर, डॉ. विजय भटकर आदींना डी.लिट. ही पदवी देऊन गौरवण्यात आले.

Patanjali Expresses Regret
एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार