scorecardresearch

Premium

ओबीसींच्या हक्कासाठी २० दिवस अन्यत्याग करणारे रवींद्र टोंगे आहेत तरी कोण? जाणून घ्या…

सरकारला ओबीसींच्या मागण्या मान्य करायला लावणारे टोंगे नेमके आहेत तरी कोण, ते काय करतात, याबाबत जाणून घेण्यास तुम्हालाही उत्सुकता असेलच.

ravindra tonge
ओबीसींच्या हक्कासाठी २० दिवस अन्यत्याग करणारे रवींद्र टोंगे आहेत तरी कोण?

चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसींच्या मागण्यांसाठी २० दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सरकारला ओबीसींच्या मागण्या मान्य करायला लावणारे टोंगे नेमके आहेत तरी कोण, ते काय करतात, याबाबत जाणून घेण्यास तुम्हालाही उत्सुकता असेलच.

टोंगे यांना २ ऑक्टोबरला रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. त्यानंतर ते चंद्रपूरलगतच्या त्यांच्या मूळ गावी वेंडली येथे पोहोचले. वेंडली या ओबीसीबहुल गावातील एका तरुणाने ओबीसींच्या न्यायिक मागण्यांकरिता तब्बल वीस दिवस अन्नत्याग उपोषण केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक गर्वान्वित झाला होता. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी टोंगे यांचे जल्लोषात स्वागत केले. टोंगे यांचा आधार नोंदणी ऑपरेटर ते आंदोलक असा प्रवास आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेतजमीन आहे. पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे.

uddhav thackeray and narendra modi
“भाजपाचे सरकार ‘बेस्ट इंडिया’ होण्यासाठी…”, ठाकरे गटाच्या टीकेवर भाजपाकडून प्रत्युत्तर
Congress leaders are creating confusion Bawankule
“काँग्रेसचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत”, बावनकुळे म्हणाले, “ओबीसींचे आरक्षण…”
Devendra Fadnavis on OBC reservation
फडणवीस म्हणतात, ओबीसींच्या आरक्षणात नवा वाटेकरी नाही
Eknath shinde and sanjay raut
“या सरकारचं थाटामाटात अंत्यसंस्कार करणार”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “तीन तासांसाठी…”

हेही वाचा >>> “हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या, “लोकांच्या मनात…”

त्यांनी गोंडवाना विद्यापीठातून एम.कॉमची पदवी घेतली. ‘टॅली’ चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आधार नोंदणी चालक म्हणून दोन वर्षे काम केले. खासगी कंपनीच्या माध्यमातून लेखापाल विभागात काम केले. ग्रामपंचायतीत माहिती प्रवेश चालक म्हणूनही काम केले. ३५ वर्षीय या युवकाला पुढे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसायात जायचे आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही अशी भावना त्यांच्या अंगी होती. त्यातूनच ते ओबीसी महासंघाशी जुळले. त्या कार्याने वरिष्ठ प्रभावित होऊन मागील आठ वर्षांपासून ते ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is rabindra tonge who sacrificed 20 days for the rights of obcs rsj 74 ysh

First published on: 03-10-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×