अमरावती : Maharashtra mlc election result 2023 विधान परिषदेच्‍या अमरावती पदवीधर मतदार संघातील मतमोजणीला चोवीस तासांहून अधिक कालावधी लोटला आहे, पण अजूनही बाद फेरीची मतमोजणी सुरूच आहे. उमेदवारांची जास्‍त संख्‍या, मतमोजणीची संथ गती, पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर अवैध ठरलेल्‍या मतपत्रिकांचे फेरअवलोकन करण्‍याची भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्‍या प्रतिनिधींनी केलेली मागणी, या पडताळणीत गेलेला वेळ, यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्‍यास विलंब होत असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती पदवीधर मतदार संघात एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. नोंदणी झालेल्‍या २ लाख ६ हजार १७२ मतदारांपैकी ४९.७५ टक्‍के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. मतमोजणीची गती संथ होती. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्‍यास रात्रीचे साडेदहा वाजले.

हेही वाचा >>> MLC Election : अमरावती पदवीधर मतदार संघात बाद फेरीची मतमोजणी सुरूच; निकालास विलंब, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती. वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने अवैध ठरलेल्‍या ८ हजार ७३५ मतांचे फेरअवलोकन करण्‍याची मागणी केली. ही मागणी मान्‍य करण्‍यात आली. त्‍यानुसार रात्री उशिरा या मतपत्रिकांची पडताळणी सुरू करण्‍यात आली.

हेही वाचा >>> MLC Election 2023: अमरावती पदवीधर मतदार संघात ‘त्‍या’ अवैध मतांचे गूढ….

या पडताळणीत तब्‍बल अडीच तासांचा वेळ गेला. त्‍यानंतर बाद फेरीची मतमोजणी सुरू करण्‍यात आली. विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा ४७ हजार ७०१ इतका निश्चित करण्‍यात आला आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. दुस-या पसंतीच्‍या मतांची मोजणी करण्‍यात येत असून ही प्रक्रिया वेळखाऊ असल्‍याने अंतिम निकाल जाहीर होण्‍यास विलंबच होईल, असे सांगण्‍यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why amravati graduate constituency result pending number of candidates mma 73 ysh
First published on: 03-02-2023 at 10:02 IST