Premium

बापरे! पत्नीने पतीची लाटण्याने मारून केली हत्या; अन् पोलिसांसमोर रचला आत्महत्येचा बनाव

ही घटना अंजनगाव सुर्जी ठाण्याच्या हद्दीतील हंतोडा येथे घडली. या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

wife killed her husband by beating with wooden rolling
प्रातिनिधिक छायाचित्र

अमरावती : कौटुंबिक कलहातून पत्नीने पतीची लाटण्याचे वार करून हत्या केली. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु, शवविच्छेदन अहवालावरून सहा दिवसांनी तिचे बिंग फुटले. ही घटना अंजनगाव सुर्जी ठाण्याच्या हद्दीतील हंतोडा येथे घडली. या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर गुराख्याचा बलात्कार, कुऱ्हाड घेऊन मागे…

नीलेश शंकरराव इंगळे (३५) रा. हंतोडा असे मृत पतीचे नाव आहे. जया नीलेश इंगळे (३२) रा. हंतोडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पत्‍नीचे नाव आहे. नीलेश व जया यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणावरून वाद होता. शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी त्यांच्यात याच कारणावरून वाद उद्भवला. या वादात जयाने पती नीलेशवर लाटण्‍याने वार केले. त्यात नीलेशचा मृत्यू झाला. त्यानंतर जयाने पती नीलेश यांनी अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला आणि अंजनगाव सुर्जी पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा >>> गोंदियात हनीट्रॅप, इन्स्टाग्रामवर मैत्री अन् अश्लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलिंग; व्यावसायिकाकडून उकळले २ लाख रुपये

तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पंचनाम्यादरम्यान मृतक नीलेशच्या शरीरावर रक्ताचे डाग व मारहाणीच्या खूणा दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यात मृत नीलेशच्या आई-वडिलांनीही मुलाची हत्या करून गळफास लावल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरूनही जबर मारहाणीमुळे नीलेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृतक नीलेशचे वडील शंकरराव त्र्यंबक इंगळे (७०) रा. ग्राम हंतोडा यांची तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी बुधवारी आरोपी जया इंगळेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धाडसे करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wife killed her husband by beating with wooden rolling pin over family dispute mma73 zws

First published on: 05-10-2023 at 18:26 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा