नागपूर : पैशाच्या वादातून एका आरोपी पतीने पत्नीच्या अंगावर असिड फेकले तर मेहुण्यावर ब्लेडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आन्त. भारती विनोद विनकणे (रा. वेलतूर) आणि सौरव यावलकर अशी जखमींची नावे आहेत.

आरोपी विनोद विनकणे हा मूळचा कुही तालुक्यातील नवेगाव येथील रहिवाशी आहे. तो पत्नी भारती आणि दोन मुलांसह वेलतूरला राहायला आला होता. त्याने सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरू केले होते तर तेथेच त्याची पत्नी भारती ही शिवणकाम करीत होती. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत पैशाचा वाद सुरू होता. त्यामुळे दोघांत नेहमी खटके उडत होते. शुक्रवारी सायंकाळी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर विनोदने सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी आणलेले अ‍ॅसिड पत्नीच्या अंगावर फेकले. त्यात महिलेच्या पायाचा काही भाग जळाला.

तिने भाऊ सौरवला फोन करून घटनेची माहिती दिली. तो तेथे आला असता विनोदने त्याच्यावरही ब्लेडने हल्ला करीत जखमी केले. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला अटक केली. लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : पैशाच्या वादातून एका आरोपी पतीने पत्नीच्या अंगावर असिड फेकले तर मेहुण्यावर ब्लेडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आन्त. भारती विनोद विनकणे (रा. वेलतूर) आणि सौरव यावलकर अशी जखमींची नावे आहेत.

आरोपी विनोद विनकणे हा मूळचा कुही तालुक्यातील नवेगाव येथील रहिवाशी आहे. तो पत्नी भारती आणि दोन मुलांसह वेलतूरला राहायला आला होता. त्याने सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरू केले होते तर तेथेच त्याची पत्नी भारती ही शिवणकाम करीत होती. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत पैशाचा वाद सुरू होता. त्यामुळे दोघांत नेहमी खटके उडत होते. शुक्रवारी सायंकाळी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर विनोदने सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी आणलेले अ‍ॅसिड पत्नीच्या अंगावर फेकले. त्यात महिलेच्या पायाचा काही भाग जळाला. तिने भाऊ सौरवला फोन करून घटनेची माहिती दिली. तो तेथे आला असता विनोदने त्याच्यावरही ब्लेडने हल्ला करीत जखमी केले. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला अटक केली.