scorecardresearch

Premium

चित्त्यांच्या भारतप्रवासासाठी विमानात बदल ; सुरक्षेसाठी खास व्यवस्था; पशुवैद्यकांचीही सज्जता

भारतात येणाऱ्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे.

wild cheetahs from namibia coming to india
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : भारतातील चित्त्याच्या आगमनाला आता सुमारे ५० तासांचा कालावधी शिल्लक असून नामिबियातील चित्ते बोईंगमध्ये बसण्यासाठी सज्ज झाले आहेत. नामिबियाची राजधानी विंडहोक येथून शुक्रवारी  विमान भारताकडे कूच करेल. चित्त्यांच्या स्थलांतरासाठी या विमानात विशेष बदल करण्यात आले आहेत.

भारतात येणाऱ्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. हे विमान ‘अल्ट्रा लाँग रेंज जेट’ असून १६ तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते इंधन भरण्यासाठी न थांबता नामिबियाहून थेट भारतापर्यंत उड्डाण करु शकेल. वैज्ञानिक शोधाला चालना देण्याच्या उद्देशाने अमेरिका आधारित आंतरराष्ट्रीय विविध विषयांशीसंबंधित व्यावसायिक सोसायटी ‘एक्सप्लोर्स क्लब’ने या हवाई मोहिमेला ध्वजांकित मोहीम असे नाव दिले आहे. या विमानाची संपूर्ण व्यवस्था पाहणारे ‘अ‍ॅक्शन एव्हीएशन’चे अध्यक्ष मार्कर आणि हॅमिश हर्डिग हे या मोहिमेवर ‘एक्सप्लोर्स क्लब’चा ध्वज घेऊन जातील. या संपूर्ण मोहिमेनंतर हा ध्वज न्यूयॉर्कमधील क्लबच्या मुख्यालयात संग्रहित केला जाईल.

motorized garbage collection vehicle, strike of contract basis workers
चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था
huge employees crowd in pension court of guardian minister mangal prabhat lodha
‘रामलीला’साठी मैदानांचे भाडे निम्म्यावर; अग्निशमन शुल्कही माफ, लोढा यांचे निर्देश 
guardian minister dada bhuse expressed office Registration Stamp Department help citizens provided quality services
नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास
four thousand bmc health workers warned of agitation on october 4
मुंबई: आरोग्य सेविकांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

या मोहीमेत नामिबियातील भारताचे उच्चायुक्त प्रशांत अग्रवाल, ‘प्रकल्प चित्ता’चे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव विक्रमसिंह झाला, भारतीय वन्यजीव संस्थेचे अधिष्ठाता सनथ कृष्णा मुलिया, चित्ता संवर्धन फाउंडेशनचे संस्थापक लॉरी मार्कर, कार्यकारी संचालक एली वॉर्कर यांच्यासह आठ अधिकारी आणि तज्ज्ञ या मोहिमेदरम्यान नामिबियाच्या चित्तांवर देखरेख करतील.

कधी येणार?

शुक्रवारी चित्त्यांना घेऊन नामिबियातून भारताकडे निघणारे हे विमान शनिवारी सकाळी जयपूरला पोहोचेल. तेथून त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हेलिकॉप्टरमधून नेण्यात येईल.

व्यवस्था कशी?

पिंजरे सुरक्षित ठेवण्यासाठी विमानात आणि विशेषकरून मुख्य केबिनमध्ये बदल करण्यात आले आहेत. चित्त्यांसोबत असणाऱ्या पशुवैद्यकांना उड्डाणादरम्यान पिंजऱ्यापर्यंत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली असून तशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wild cheetahs from namibia coming to india in customised jumbo jet zws

First published on: 15-09-2022 at 03:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×