नागपूर : ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ या अमेरिकेतील हवामान अभ्यासक संस्थेने ‘एल निनो’च्या आगमनाची वर्दी दिली आहे. दर महिन्याच्या नऊ तारखेला या संस्थेकडून ‘एल निनो’ बाबत माहिती दिली जाते. आगमनाची माहिती देतानाच हिवाळ्यात ‘एल निनो’ आणखी मजबूत होण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली आहे.

हेही वाचा – ‘बिपरजॉय’ आणखी तीव्र; भारताच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?
article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट! 

‘एल निनो’ ही नैसर्गिक घटना असून सरासरी दर दोन ते सात वर्षांनी येते. त्यांच्या प्रभावामुळे जगभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळाचा धोका वाढतो. त्याचा हवामानावरील प्रभाव प्रशांत महासागरापलीकडे पसरला आहे. भारताने २००२, २००४, २००९ आणि २०१२ या वर्षात जी दुष्काळी स्थिती अनुभवली, ती ‘एल निनो’ मुळेच असल्याचे म्हटले जाते. पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यताही यामुळे नाकारता येत नाही. ‘एल निनो’चा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. त्यामुळे मान्सूनच नाही तर हिवाळादेखील उबदार होतो आणि उन्हाळा आणखी उष्ण होतो.