scorecardresearch

Premium

यंदा थंडी गायब! विदर्भात पाच वर्षांपूर्वी तापमानाचा निच्चांक

विदर्भात तापमानाचा पारा सर्वाधिक असताना याच विदर्भात हिवाळ्यात तापमानाचा पारा सर्वाधिक कमी झालेला सुध्दा दिसून आला आहे.

winter is disappeared this year Vidarbha recorded the lowest temperature before five years
यंदा विदर्भातून थंडी गायब झाली की काय, असा प्रश्न वैदर्भीयांना पडला आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : विदर्भात तापमानाचा पारा सर्वाधिक असताना याच विदर्भात हिवाळ्यात तापमानाचा पारा सर्वाधिक कमी झालेला सुध्दा दिसून आला आहे. मात्र, यंदा डिसेंबर उगवला तरी थंडीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे यंदा विदर्भातून थंडी गायब झाली की काय, असा प्रश्न वैदर्भीयांना पडला आहे.

idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा
Chance of rain between 25th and 26th February Nagpur
२५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पावसाची शक्यता !
climate change election issue india
हवामान बदल अन् भारतातील निवडणूक, नेमका संबंध कसा?

आणखी वाचा-चंद्रपुरच्या प्रदुषणात नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कारणे व दुष्परिणाम

भारतीय हवामान खात्याने डिसेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होईल असे सांगितले होते. मात्र, आता विदर्भाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा थंडी कमी राहील, असे सांगितले आहे. पाऊस कमी पडल्यामुळे किमान तापमान देखील अधिक राहील. सध्या विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अचानक थंडी आणि अचानक उकाडा असे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात केवळ दोन दिवस किमान तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा थंडी गायब होऊन उकाडा जाणवू लागला आहे. विदर्भात पाच वर्षांपूर्वी याच डिसेंबर महिन्यात २०१८ साली ३.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कधीही तापमानाचा निच्चांक नोंदवला गेला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Winter is disappeared this year vidarbha recorded the lowest temperature before five years rgc 76 mrj

First published on: 03-12-2023 at 11:26 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×