यवतमाळ : भारतासह जगभरात नुकताच साजरा झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त तरूणाईने तब्बल आठवडाभर अलिंगनादी सोहळे साजरे केले. मात्र, यवतमाळातील दोन चिमुकल्यांनी चक्क वृक्षाला अलिंगन देत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करीत समाजाला कृतीतून मोठा संदेश दिला.

हेही वाचा >>> अकोला : टिप्पर काळ बनून आला, विद्यार्थ्याच्या डोक्यात हेल्मेट होते तरी…

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

यवतमाळ येथील पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा संकल्प फाऊंडेशनचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांनी आपल्या मुलांकडून सामाजिक संदेश देण्यासाठी हा उपक्रम घडवून आणला. व्यक्ती, प्राणी कोणालाही प्रेमाने जवळ घेऊन अलिंगन दिले तर मन:शांतीसह सुरक्षेची भावनाही निर्माण होते. वृक्षही सजीवच आहेत. त्यांना बोलता येत नसले तर ते प्रेमाची, स्पर्शाची भाषा जाणतात हे पर्यावरण संवर्धनाचे काम करत असताना वारंवार जाणवते. याच जाणीवेतून ‘व्हॅलेंटाईन डे’ला वृक्षांना अलिंगन देवून हा दिवस साजरा करण्याची संकल्पना सूचली आणि मुलगी काश्यपी व मुलगा वाहुल यांना वृक्षाला अलिंगन देवून संवाद साधायला लावले, असे विनोद दोंदल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर : ‘एचआयव्ही’ग्रस्त सात वर्षीय मुलाची ‘थॅलेसेमिया’वर मात

वृक्षाला अलिंगन देतानाचे त्यांचे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि हा मुद्दा चर्चेत आला. मुलांमध्ये पर्यावरणासह वृक्षांबद्दल प्रेमाची समज रूजविण्यासाठी हा प्रयोग केल्याचे दोंदल म्हणाले. पर्यावरण संवर्धनसाठी मुलांमध्ये जल, जंगल, जमीन याबद्दल जागृती होणे गरजेचे आहे. अशा छोट्या छोट्या कृतींमधून आजची ही मुले उद्या जबाबदार नागरिक  बनतील, अशी अपेक्षा दोंदल यांनी व्यक्त केली. या अभिनव वृक्ष अलिंगनाबद्दल त्यांच्या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.