scorecardresearch

Premium

महिलेच्या प्रियकराचा तिच्या मुलीवर बलात्कार, मुलगी सात महिन्यांची गर्भवती

सुरेंद्रने मार्च महिन्यात त्याने रात्रीच्या सुमारास मुलीला शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने आईच्या बदनामीची भीती दाखवत बलात्कार केला.

rape of young woman on the lure of marriage a case was registered against one crime police pune
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

नागपूर : एकाच घरात राहणाऱ्या आईच्या प्रियकराची वाईट नजर तिच्या १७ वर्षांच्या मुलीवर गेली. त्याने आईच्या बदनामीची धमकी देऊन मुलीशी बळजबरी करत मुलीला ७ महिन्यांची गर्भवती केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र पाथक (५२) हा मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो बांधकाम मिस्त्री असून कामाच्या शोधात नागपुरात आला. तो बुटीबोरीत राहायला लागला. त्याच्या सोबत ३६ वर्षीय मजूर महिला काम करीत होती. महिलेच्या पतीने तिला गेल्या १६ वर्षांपूर्वीच सोडले होते. त्यामुळे ती मुलीसह राहत होती. सुरेंद्रला दारुचे व्यसन आहे. महिलेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला आर्थिक मदत केली. अविवाहित असून एकटा राहत असल्याचे सांगून महिलेशी जवळिक साधली. महिलेलासुद्धा पती नसल्याची बाब त्याने हेरली. तो तिला सोबत कामावर न्यायला लागला. तसेच त्याने तिला सोबत राहून एकमेकांना साथ देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलाही त्याच्या जाळ्यात अडकली.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

हेही वाचा : ..तर वेगळी भूमिका घेऊ ! ; राणांच्या आरोपानंतर कडूंचा राज्य सरकारला इशारा

तो महिलेच्या घरी राहायला आला. सुरवातीला मुलीने दोघांना सोबत राहण्यास नकार दर्शविला. परंतु, तिच्या आईने तिची समजूत घातली. त्यामुळे आरोपी सुरेंद्र हा मायलेकीसह एकाच घरात राहायला लागला. मागील जानेवारी महिन्यात पीडित मुलीची आई घरी नव्हती. सुरेंद्र हा दारू पिऊन घरी आला. घरात कपडे बदलत असलेल्या मुलीला बघून वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्याशी बळजबरी अश्लील चाळे केले. मुलीने चिडून त्याला प्रतिकार केला. सायंकाळी आईला सांगण्याची धमकी दिली. त्याने आईशी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत तिला सांगितले. तसेच आईची गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने आईला सांगणे टाळले. त्यामुळे सुरेंद्रची हिम्मत वाढली. तो नेहमी मुलीशी अश्लील कृत्य करायला लागला. मार्च महिन्यात त्याने रात्रीच्या सुमारास मुलीला शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने आईच्या बदनामीची भीती दाखवत बलात्कार केला. त्यानंतर सुरेंद्रने मुलीशी अनेकदा अत्याचार. त्यातून ती गर्भवती झाली.

हेही वाचा : लहान मुले, ज्येष्ठांना दिवाळीचा फराळ देताना विशेष काळजी घ्या

आईच्या भीतीपोटी मुलगी गप्प

सुरेंद्रने अविवाहित असल्याचे सांगून महिलेशी घरोबा केला. मात्र, सुरेंद्रला पत्नी व तीन मुले आहेत. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर घाबरली. आईला सांगितल्यास रागावेल, या भीतीपोटी तिने कुणालाच सांगितले नाही. सात महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आईला संशय आला. मुलीला डॉक्टरकडे नेले. त्यामुळे सुरेंद्रचे कृत्य उघडकीस आले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman boyfriend rape her daughter girl is pregnant crime news nagpur tmb 01

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×