Premium

वाशीम: वीज पडून महिलेचा मृत्यू, चार जनावरेही दगावली

प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

Woman dies due to electric shock in washim
वाशीम: वीज पडून महिलेचा मृत्यू, चार जनावरेही दगावली ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

वाशीम : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील अनसिंग येथील नफिजा परवीन शेख रफीक (३०) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला तर इतर ठिकाणी चार जनावरे दगावलीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या दरम्यान अनेक ठिकाणी विजेमुळे जीवितहानी झाली. वाशीम तालुक्यातील मौजे अनसिंग येथील नफिजा परवीन शेख रफिक यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. रिसोड तालुक्यातील मौजे नेतन्सा येथील तुकाराम विठोबा बाजड यांच्या शेतात असलेली गाय व म्हैस आणि मानोरा तालुक्यातील मौजे रुई येथील शेतकरी सुनील वैजनाथ जंगम यांचे मालकीचे दोन बैल विज पडून मृत पावले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman dies due to electric shock in washim pbk 85 amy

First published on: 21-09-2023 at 20:33 IST
Next Story
ताडोबासह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या बुकींगसाठी आता एकच संकेतस्थळ; २३ सप्टेंबर पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल