गोंदिया : गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यां अंतर्गत येत असलेल्या कुडवा जवळील राणी अवंतीबाई चौकात एक शिक्षिकेच्या दुचाकी वाहनाला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शी ने सांगितलेल्या माहितीनुसार सदर भरधाव ट्रक ने महिला शिक्षिकेला काही अंतरापर्यंत चिरडत नेले यात शिक्षिकेच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अल्विना जेम्स लुईस वय ३१ वर्ष रा. अरिहंत कॉलोनी कुडवा,गोंदिया असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. हेही वाचा >>> अमरावती : मान्यता नाकारली! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय… ही शिक्षिका गोंदिया इथून अंभोरा येथील शाळे मध्ये जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी तिरोडा कडून बालाघाट टी पॉईंट कडे जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षकेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काही काळासाठी परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाला होता. घटनास्थळी एकत्र झालेले नागरिक शहरातील वाहतूक व्यवस्था आणि या चौकात लावण्यात आलेल्या अवैध फलका मुळे वळण घेताना निर्माण झालेलीअदृश्यता ला कारणीभूत ठरवीत होते. तणाव वाढत असताना मात्र रामनगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत ट्रक व चालक याला ताब्यात घेतल यामुळे हा तणाव निवळला आहे. हेही वाचा >>> पहिले विरोध, आता तंत्रज्ञानाचा अभ्यास; इव्हीएमवर असाही यू टर्न घटना स्थलावरुन शिक्षिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी के.टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर या चौकातील परिस्थिती बघितली असता या राणी अवंतीबाई चौक परिसरात मोठ्या प्रमाणात तथाकथीत एका युवा नेत्यांचे वाढदिवस शुभेच्छा देणारेअनधिकृत फलक लागले असून या फलकामुळे या चौकातून वळण घेताना दुसरीकडून येणारे वाहन दिसून येत नाही. त्यातच या चौकात असलेला सहयोग हाॅस्पीटलच्या बाजूने असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेऊन अर्धा रस्ता व्यापला जातो, त्यामुळे सुध्दा येथील रहदारीला त्रास होत असतो.गेल्या काही दिवसापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतुक विभागाला निवेदन देवून वाहनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र त्यानंतरही विभागाला जाग आली नाही आणि आज त्याच परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका शिक्षिकेला चिरडल्याने या परिसरातील नागरिकांत मोठा असंतोष दिसून येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर अवैध फलक लावणारे व वाहने ठेवणार्यावर कारवाई करण्याची मागणी राणीअवंतीबाई चौकातील नागरिकांनी केली आहे.