scorecardresearch

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूरच्या पाहार्णी येथील घटना

शेतात गेलेली महिला सांयकाळ उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून गावकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूरच्या पाहार्णी येथील घटना
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार (प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता ग्राफिस्क टीम)

चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. वनिता वासुदेव कुंभरे ( ५७), असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- ‘मला सासू-सासऱ्याने मारहाण केली, मी…’; पोलिसांना फोन करून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

वनिता कुंभरे शनिवारी दुपारी शेतातील गवत कापत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत शेतशिवरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेहच आढळला. मृत वनिता कुंभरे यांच्या पश्चात पती, दोन मुले आणी एक मुलगी आहे. माहिती मिळताच वनविभाग नागभीड येथील कर्मचारी पाहार्णी येथे दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:04 IST

संबंधित बातम्या