scorecardresearch

Premium

जिजाऊंच्या जिल्ह्यात उमेदवारीत महिला दुर्लक्षित

जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात एकाही राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे.

Women Lok Sabha election Buldhana
जिजाऊंच्या जिल्ह्यात उमेदवारीत महिला दुर्लक्षित (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

बुलढाणा : महिलांना नजीकच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन अधिनियमा’वर व्यापक चर्चा रंगली आहे. मात्र, जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात एकाही राजकीय पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे.

संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर १९६२ मध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक झाली. त्याकाळात जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनसंघ, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं, समाजवादी पक्ष हे प्रमुख राजकीय पक्ष होते. कालांतराने यात जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ या पक्षांची भर पडली. १९६२ ते २०१९ दरम्यान तब्बल पंधरा निवडणुका पार पडल्या. जनसंघ, काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, भाजपा, राष्ट्रवादी, बसपा, समाजवादी पक्ष, भारिप, शेकाप या पक्षांनी कमी जास्त प्रमाणात बुलढाणा मतदारसंघात निवडणुका लढवल्या. मात्र त्यांनी महिलेला लोकसभेची उमेदवारी दिलीच नाही.

Ajit Pawar group washim
वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात नाराजीनाट्य! सहकारमंत्र्यांच्या समोरच…
ajit pawar in baramati politics
अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी
Sanjivraje Naik Nimbalkar Satara
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर
email
लोकमानस : राजकारण लांडग्यांचा खेळ झाला आहे का?

हेही वाचा – मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत

हेही वाचा – इंडिया की एनडीए? मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केल्यास काँग्रेस, समाजवादी पार्टीला बसणार फटका!

स्थानिक स्वराज्य संस्थांत ३३ टक्के आरक्षणामुळे महिला जिल्हा परिषद, पालिका अध्यक्ष झाल्या, पंचायत समितीच्या सभापती झाल्या. १९६२ पासून महिलांना काँग्रेस व नंतर भाजपाने आमदार केले. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी महिलांचा आजवर कधीच विचार झाला नाहीये. महिला मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या जवळपास बरोबरीत आली. मात्र खासदारकीबाबत अजूनही ‘दिल्ली दूर है,’ असेच प्रतिगामी चित्र कायम आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women neglected in lok sabha election candidature in buldhana district print politics news ssb

First published on: 30-09-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×