अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पडणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे आणि ही जमीन खासगी कंपनीला विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर विभागीय आयुक्त (महसूल) विजयालक्ष्मी -बिदरी यांची भेट घेतली. गेल्या ४८ दिवसांपासून या मुद्यांवरून महिला आंदोलन सुरू आहे. पण, राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे जागतिक महिला दिनी काळे वस्त्र परिधान करून महिलांनी राज्य शासन आणि प्रशासनाचा निषेध केला.
हेही वाचा >>>बुलढाणा: महिला दिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; जिल्हा कचेरी परिसरात पोलिसांची तारांबळ
डॉ. आंबेडकर स्मारकाची (अंबाझरी) २० एकर जमीन खासगी कंपनीला विकसित करण्यासाठी देण्याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती आंदोलन करीत आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रारीवजा निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांना पत्र पाठवण्यात आले. मात्र, शासन आणि प्रशासनाने हे आंदोलन गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे महिलांनी काळे वस्त्र परिधान करून शासन आणि प्रशासनाचा निषेध केला.