लोकसत्ता टीम
नागपूर : जगभरात महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. महिला दिनी काही पुरूष आपल्या पत्नी, मैत्रिनीला सोने- चांदीचे दागिने भेटही देत असतात. मात्र शनिवारच्या (८ मार्च २०२५) महिला दिनी सोन्याचे दर बघून महिलांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या शनिवारच्या दबाबाबत आपण जाणून घेऊ या.
सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. करोनानंतर बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. दरम्यान मध्यंतरी सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा सोन्याचे दर वाढून आणखी नवीन उंचिवर पोहचले आहे. महिला दिनीही सोन्याचे दर जास्तच असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८५ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये होते.
दरम्यान, नागपुरात जागतिक महिला दिनाच्या दिवशी शनिवारी (८ मार्च २०२५ रोजी) सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये नोंदवले गेले. हे दर ६ मार्च २०२५ रोजी प्रति दहा ग्राम ८६ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये होते. त्यामुळे महिला दिनी सोन्याच्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. त्यातच सराफा व्यवसायिकांकडून सोन्याचे दर येत्या काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता आणखी वाढण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे आताच्या काळात सोने- चांदीमध्ये गुंतवणुक फायद्याची असल्याचा दावा सराफा व्यवसायिकांकडून केला जात आहे.
चांदीच्या दरातही मोठे बदल…
नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९५ हजार ३०० रुपये होते. हे दर आठ दिवसांनी म्हणजेच जागतिक महिला दिनी ८ मार्च २०२५ रोजी प्रति किलो ९७ हजार ५०० रुपये होते. त्यामुळे १ मार्चच्या तुलनेत ८ मार्चला चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल २ हजार ३०० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. हे दर ३ मार्च २०२५ रोजी प्रति किलो ९४ हजार ४०० रुपये होते.