आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  समाजकल्याण विभागातील राजपत्रित अधिकारी संघटने गुरुवारपासून सतरंजीवर बसून काम करणे सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनाच्य पहिल्या दिवशी येथील सामाजिक न्याय भवनात अधिका-यांनी जमिनीवर सतरंजी टाकून कामकाजाल सुरुवात केली. ऐरवी खुर्चीवर बसणारे अधिकारी खाली बसलेले पाहून अभ्यागतांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे विविध कामांसाठी कार्यालयात येणा-या अभ्यागतांना बसायला खुर्च्या दिल्या जात होत्या.

अधिकाऱ्यांचच्या मागण्यांसाठी  सातत्याने पाठपुरावा करुन सुद्धा शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनाचा परिणाम जात प्रमाणपत्र वाटपावर होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work social welfare officers sitting ground protest government social welfare gazetted officer organization amy
First published on: 23-06-2022 at 11:48 IST